परभणी - सेलू येथे दिव्यांग गाईला कृत्रिम पाय बसविण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. दादुपंथी मठ गोशाळेत प्राण्यांच्या दिव्यंगत्वावर हा प्रयोग करण्यात आला आहे.
हे ही वाचा - परभणीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मतदान जागृती करणाऱ्या पथकाला पिटाळले
अनेक राजकीय, सामाजिक संस्था तसेच पुढाऱ्यांकडून माणसांमधील दिव्यांगांवर विविध शस्त्रक्रिया आणि अवयव दानाची शिबिरे करतात. मात्र, प्राण्यांमधील दिव्यांगत्वाकडे कोणी पाहतही नाही. अनेक प्राणी दिव्यांगतत्त्वामुळे खाटकाला बळी जातात किंवा तडफडत राहतात. मात्र, सेलू येथे अशाच एका दिव्यांग गाईला कृत्रिम पाय बसविण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
हे ही वाचा - परभणीतील ढालेगाव-मुदगल बंधारे तुडुंब भरले
सेलूतील दादुपंथीमठ गोशाळेत गो प्रेमींनी प्राण्यांच्या दिव्यंगत्वावर मात करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. सुर्यकांत जाधव, दत्तराव पौळ, दिगंबर पवार यांनी गोशाळेत दाखल करण्यात आलेल्या दिव्यांग गायीसाठी कृत्रीम पाय तयार करून या कृत्रीम पायाचे यशस्वी प्रत्यारोपण केले आहे. दिव्यांग प्राण्यांच्या होणाऱ्या कत्तली थांबव्यात, या हेतूने हा प्रयोग केला अशी प्रतिक्रिया संत गोविंद बाबा दादुपंथी मठ गोशाळेच्या गो सेवकांनी दिली.
हे ही वाचा - जेथे शौर्याचा इतिहास, आता तेथे 'छमछम'ची व्यवस्था; शरद पवार यांचे भाजपवर टीकास्त्र
दरम्यान, दिव्यांग व्यक्तींना कृत्रीम अवयवांचे प्रत्यारोपण करून दिव्यंगत्वावर मात केल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण प्राण्यांच्या दिव्यंगत्वावर मात करण्यासाठी झालेले प्रयत्न क्वचीत प्रसंगीच अनुभवण्यास मिळतात. त्यामुळे गोशाळेच्या या यशस्वी प्रयोगाचे गो प्रेमी व शेतकऱ्यांनी कौतुक केले आहे.
हे ही वाचा - महापरिक्षा पोर्टल बंद करण्याच्या मागणीसाठी परभणीत विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा