ETV Bharat / state

निष्क्रिय पोलिसांच्या विरोधात परभणीतील सोनपेठ शहर कडकडीत बंद - sonpeth city police lightness action

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरातील वाढत्या चोऱ्यांमुळे शहरातील व्यापाऱ्यांनी सोनपेठ बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार, गुरुवारी बंद पाळून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

सोनपेठ शहर कडकडीत बंद
author img

By

Published : Oct 3, 2019, 9:37 PM IST

परभणी - पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे सोनपेठ शहरात गेल्या अनेक महिन्यांत झालेल्या चोऱ्यांचा तपास लागला नाही. परिणामी, दिवसेंदिवस चोरट्यांचे मनोबल वाढत असून चोरीच्या घटना सतत घडत आहेत. यामुळे दहशतीखाली असल्याचे सोनपेठवासियांनी सांगितले. या सर्व प्रकाराला पोलिसांची निष्क्रियता कारणीभूत असून या विरोधात आज (गुरुवारी) सोनपेठ शहरात कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आल्याचे गावकरी म्हणाले.

सोनपेठ शहर कडकडीत बंद

हेही वाचा - नांदेडमध्ये गोवा बनावटीची 12 लाखांची अवैध दारू जप्त, ५ जणांना अटक

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरातील वाढत्या चोऱ्यांमुळे शहरातील व्यापाऱ्यांनी यापूर्वीच सोनपेठ बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार गुरुवारी बंद पाळून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सोनपेठ शहरात एप्रिल महिन्यापासून छोट्या-मोठ्या चोऱ्या सातत्याने होत आहेत. घरफोडी किंवा मार्केटमधील दुकानात अनेक चोऱ्या झाल्या आहेत. परंतु, आजपर्यंत एकाही चोरी प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही.

चार दिवसापूर्वीच राजाभाऊ कदम नगरमध्ये साठे यांच्या घरी चोरी झाली. तर विटा रोडवर शाम पांपटवार यांच्या दुकानावर देखील मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाला. तसेच आण्णाभाऊ साठे चौक ते शिवाजी चौकादरम्यानच्या नागरे यांच्या दुकानांत चोरी झाली. याशिवाय राजेभाऊ कराड यांच्या किराणा दुकानातून व रघुवीरसिंग शाहू यांच्या दुकानातून चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात माल लंपास केला. तसेच किरण चौलवार यांचे शेळगांव रोडवरील गोदामात, गजानान लांडे यांचे कापड दुकानात, मदनराव लांडे किराणा दुकानातसुद्धा चोरी झाली आहे.

हेही वाचा - अबब! चोरट्यांनी पळवले ठाणे महापालिकेच्या पाण्याचे विद्युत मीटर

याखेरीज विठ्ठलराव पुरबुज यांचे दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाला. तसेच, शारदानगर मधील पुरबुज यांच्या घरासमोरील गाडीचे देखील कुलुप तोडून गाडी पळवण्याचा प्रयत्न झाला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या होऊनही सोनपेठचे पोलीस तपास करण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप नागरिकांनी केला. परंतु, यामुळे शहरातील व्यापारी भयभीत झाले आहेत.

त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या प्रकरणाचा निषेध म्हणून कडकडीत बंद ठेवून पोलीस प्रशासनालाच निवेदन देवून त्यांचाच जाहीर निषेध केला. यावेळी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा - ठाणे : भिवंडीत दुचाकी जळीतकांड

Intro:परभणी - पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे सोनपेठ शहरात गेल्या अनेक महिन्यांत झालेल्या चोऱ्यांचा तपास लागला नाही. परिणामी, दिवसेंदिवस चोरट्यांचे मनोबल वाढत असून चोरीच्या घटना सतत घडत आहेत. यामुळे सोनपेठकर दहशतीखाली आहेत. याला पोलिसांची निष्क्रियता कारणीभूत असून या विरोधात आज (गुरुवारी) सोनपेठ शहर कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आला.Body:परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरातील वाढत्या चोरामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी यापूर्वीच सोनपेठ बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार आज बंद पाळून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सोनपेठ शहरात एप्रिल महिन्यापासुन छोट्या-मोठ्या चोऱ्या सातत्याने होत आहेत. घरफोडी किंवा मार्केट मधील दुकानात अनेक चोऱ्या झाल्या. परंतु आजपर्यंत एकाही चोरी प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही. चार दिवसापुर्वीच राजाभाऊ कदम नगर मध्ये साठे यांच्या घरी चोरी झाली. तर विटा रोडवर शाम पांपटवार यांचे दुकानावर देखील मध्ये रात्री चोरीचा प्रयत्न झाला. तसेच आण्णाभाऊ साठे चौक ते शिवाजी चौका दरम्यानच्या नागरे यांच्या दुकानांत चोरी झाली. याशिवाय राजेभाऊ कराड यांचे किराणा दुकानातुन व रघुविरसिंग शाहु यांचे दुकानातून चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात माल लंपास केला. तसेच किरण चौलवार यांच शेळगांव रोडवरील गोदामात, गजानान लांडे यांचे कापड दुकानात, मदनराव लांडे किराणा दुकानात सुद्धा चोरी झाली आहे.
या खेरीज विठ्ठलराव पुरबुज यांचे दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाला. तसेच शारदानगर मधील पुरबुज यांच्या घरासमोरील गाडीचे देखील कुलुप तोडुन गाडी पळवण्याचा प्रयत्न झाला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या होऊनही सोनपेठचे पोलीस तपास करण्यात अपयशी ठरले आहेत. परंतु यामुळे शहरातील व्यापारी भयभीत झाले आहेत.
त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या प्रकरणाचा निषेध म्हणुन आज प्रतिष्ठाणे कडकडीत बंद ठेवून पोलीस प्रशासनालाच निवेदन देवून त्यांचाच जाहीर निषेध केला. यावेळी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- sonpeth_close_photo & sonpeth_close_vis_1, 2Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.