ETV Bharat / state

परभणीत शिवसेनेची विजयी रॅली; खासदार जाधवांचा ४२ हजार १९९ मतांनी विजय - rally

संध्याकाळी ६ वाजता वसमत रोड वरुन शिवसेनेची ही रॅली स्टेशन रोडमार्गे शिवाजी चौकात रात्री १० वाजता पोहोचली. रॅलीत डीजेच्या तालावर तरुणाई तसेच शिवसैनिकांनी ठेका धरला होता.

परभणीत शिवसेनेची विजयी रॅली
author img

By

Published : May 23, 2019, 11:59 PM IST

परभणी - सुमारे ३० वर्षांपासून परभणी लोकसभेवर एकहाती सत्ता मिळवणाऱ्या शिवसेनेला यावेळी देखील आपला झेंडा कायम ठेवण्यात यश आले. विद्यमान खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांना ४२ हजार १९९ मतांनी धूळ चारत विजय संपादन केला.

परभणीत शिवसेनेची विजयी रॅली

विजयानंतर शिवसैनिकांनी मतदान मोजणी केंद्रावर जल्लोष केला. दुपारी ४ वाजता मताधिकाराचा कौल येताच शिवसेनेच्यावतीने जल्लोष रॅलीची तयारी करण्यात आली. त्यानुसार संध्याकाळी ६ वाजता वसमत रोड वरुन शिवसेनेची ही रॅली स्टेशन रोडमार्गे शिवाजी चौकात रात्री १० वाजता पोहोचली. रॅलीत डीजेच्या तालावर तरुणाई तसेच शिवसैनिकांनी ठेका धरला होता. यामध्ये खासदार संजय जाधव यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, भाजपचे गणेशराव रोकडे, समीर दुधगावकर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

परभणी लोकसभेच्या बाबतीत जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय विजय होणार असल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र, ६ वेळेप्रमाणे यावेळेसही परभणीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेनेचे मताधिक्य घटले असले तरी अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेने एकूण १२ लाख ५२ हजार ७८२ मतांपैकी ५ लाख ३८ हजार ९४१ मते मिळवली. तर, दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांनी ४ लाख ९६ हजार ७४२ मते मिळाली. तिसर्‍या क्रमांकावरचे वंचित बहुजन आघाडीची आलमगीर खान यांना १ लाख ४९ हजार ८३४ मते मिळाली. चौथ्या क्रमांकावरील भाकपचे राजन क्षीरसागर यांना १७ हजार ९५ मते मिळाली आहेत.

'एक निकाल आपली हिम्मत हरवु शकत नाही - राजेश विटेकर'

माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने उमेदवारी दिली. त्याला सर्वांनी पाठिंबा दिला. हा माझ्यासाठी मोठा सन्मान होता. पराभवाने खचून न जाता कायम पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या साथीने सर्वसामान्यांसाठी झगडत राहील. आणि एक निकाल आपल्या हिम्मतीला हरवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार राजेश विटेकर यांनी दिली.

Intro:परभणी - सुमारे तीस वर्षांपासून परभणी लोकसभेवर एकहाती सत्ता मिळवणाऱ्या शिवसेनेला यावेळी देखील आपला झेंडा कायम ठेवण्यात यश आले. विद्यमान खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांना 42 हजार 199 मतांनी धूळ चारत विजय संपादन केला. तसेच वंचित आघाडीचे आलमगीर खान हे 1 लाख 49 हजार 946 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. दरम्यान, शिवसेनेच्यावतीने सायंकाळी शहरातून मोठ्या उत्साहात विजयी रॅली काढण्यात आली. रात्री 10 वाजेपर्यंत ही रॅली सुरूच होती.Body:परभणी लोकसभेेेच्या बाबतीत जवळपास सर्वच एक्झिटपोल मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय विजय होणार असल्याचेेेे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र नेहमी प्रमाणे चर्चा जरी राष्ट्रवादीचे असले तरी शिवसेनेने मागच्या सहा वेळेप्रमाणे यंदा देखील परभणीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेनेचे मताधिक्य घटले असले तरी अत्यंत आतितटीच्या झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेेेने एकूण 12 लाख 52 हजार 782 मतांपैकी 5 लाख 38 हजार 941 मते मिळवली, तर दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांनी 4 लाख 96 हजार 742 मते घेतली. तिसर्‍या क्रमांकावरचे वंचित बहुजन आघाडीची आलमगीर खान यांना 1 लाख 49 हजार 834 मते मिळाली. या शिवाय चौथ्या क्रमांकावरील भाकपचे राजन क्षीरसागर यांना 17 हजार 95 मतेे मिळाली आहेत.
दरम्यान, विजयानंतर शिवसैनिकांनी मतदान मोजणी केंद्रावर जल्लोष केला. दुपारी चार वाजता मताधिकाराचा कौल येताच, शिवसेनेच्या वतीने जल्लोष रॅलीची तयारी करण्यात आली. त्यानुसार संध्याकाळी सहा वाजता वसमत रोड वरून निघालेली शिवसेनेची ही रॅली स्टेशन रोडमार्गे शिवाजी चौकात रात्री दहा वाजता पोहोचली. या रॅलीत डीजेच्या तालावर तरुणाई तसेच शिवसैनिकांनी ठेका धरला होता. या मध्ये खासदार संजय जाधव यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, भाजपचे गणेशराव रोकडे, समीर दुधगावकर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

"एक निकाल आपली हिम्मत हरवु शकत नाही - राजेश विटेकर"

परभणी - माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने उमेदवारी दिली. त्याला सर्वांनी पाठिंबा दिला. हा माझ्यासाठी मोठा सन्मान होता. पराभवाने खचून न जाता कायम पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या साथीने सर्वसामान्यांसाठी झगडत राहील. आणि एक निकाल आपल्या हिम्मतीला हरवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार राजेश विटेकर यांनी दिली.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत रॅली vis. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.