ETV Bharat / state

शिपाई पदभरतीवरून परभणी जिल्ह्यातील संस्थाचालकांचे 'शाळाबंद' आंदोलन

author img

By

Published : Dec 18, 2020, 6:29 PM IST

Updated : Dec 18, 2020, 6:38 PM IST

11 डिसेंबरला शासनाने यासंदर्भात काढलेल्या अध्यादेशात विरोधात जिल्ह्यातील संस्थाचालकांनी परभणीत चारच दिवसांपूर्वी शिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली होती. तसेच शासनाच्या अध्यादेशाची होळी करून निषेधही नोंदवला होता.

school closed agitation parbhani
शाळाबंद आंदोलन परभणी

परभणी - चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भात शासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी आज (शुक्रवारी) जिल्ह्यातील संस्थाचालकांनी शाळा कडकडीत बंद ठेवून शासनाच्या या निर्णयाचा विरोध केला. परभणी शहराप्रमाणे सोनपेठ, मानवत, सेलू, जिंतूर, पाथरी, पूर्णा, पालम, गंगाखेड आदी तालुका ठिकाणच्या संस्था अंतर्गत चालणाऱ्या शाळाही बंद ठेवून संस्थाचालकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.

संस्थाचालक तथा माजी आमदारविजय गव्हाणे यांची प्रतिक्रिया.

दरम्यान, 11 डिसेंबरला शासनाने यासंदर्भात काढलेल्या अध्यादेशात विरोधात जिल्ह्यातील संस्थाचालकांनी परभणीत चारच दिवसांपूर्वी शिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली होती. तसेच शासनाच्या अध्यादेशाची होळी करून निषेधही नोंदवला होता.

'...म्हणून शाळा बंद आंदोलन'

'मोर्चा काढून, निदर्शने करून देखील शासनाने आपला निर्णय न बदलल्याने हे शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले. मात्र, यापुढे शासनाने कुठलीही दखल घेतली नाही, तर शेतकऱ्यांप्रमाणे संस्थाचालकांचे आंदोलन तीव्र करण्याची येईल, असा इशारा संस्थाचालक तथा माजी आमदार विजय गव्हाणे यांनी दिला आहे. या आंदोलनात संस्थाचालक महामंडळाचे अध्यक्ष डॉ. विवेक नावंदर, कार्याध्यक्ष उदय देशमुख, सचिव बळवंत खळीकर, उपाध्यक्ष संतोश धारासूरकर, कोषाध्यक्ष अनिल तोष्णीवाल यांच्यासह अन्य संस्थाचालक सहभागी झाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अद्यापपर्यंत प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. मात्र, इयत्ता दहावीचे वर्ग दोन डिसेंबरपासून सुरू करण्यात आले होते. तेही वर्ग आजच्या (शुक्रवार) बंद आंदोलनामुळे ठप्प झाले.

हेही वाचा - कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

'या' शाळा राहिल्या बंद' -

परभणी शहरातील बाल विद्यामंदीर, मराठवाडा हायस्कूल, गांधी विद्यालय, नूतन विद्यालय, फुले विद्यालय, सारंगस्वामी विद्यालय, भारतीय बालविद्यामंदीर, राजे संभाजी विद्यालय, तरोडा, जिंतूर शहरातील जवाहर विद्यालय, एकलव्य विद्यालय, ज्ञानेश्वर विद्यालय, विलासराव देशमुख उर्दू विद्यालय, धानोरा येथील संत तुकाराम विद्यालय, किसनराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, सेलू येथील नूतन विद्यालय, के.बहा. विद्यालय, न्यू हायस्कूल, आहेर बोरगाव येथील नितीन विद्यालय पूर्णेतील विद्या प्रसारिणी, अभिनव विद्या विहार, गुरू बुद्धी स्वामी महाविद्यालय, इंदिरा गांधी विद्यालय, सौ. रूक्मिणीबाई आंभोरे विद्यालय, मिरखेल, गंगाखेडातील सरस्वती विद्यालय, व्यंकटेश विद्यालय, ममता विद्यालय, मानवतमधील नेताजी विद्यालय, शंकरराव चव्हाण विद्यालय, वाल्मीकी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कासापुरी, रामपुरी, पाथरी, देवगाव फाटा, वालूर, तसेच अन्य संस्थांच्या शाळाही कडकडीत बंद होत्या. सोनपेठ शहरातील सदूगुरू संचारेश्वर विद्यालय, नैकोटा, महालिंगेश्वर विद्यालय, जाकीर हुसेन उर्दू शाळा, मुक्तेश्वर विद्यालय, बाजीराव देशमुख विद्यालय, केदारेश्वर विद्यालय, उखळी, माधवाश्रम विद्यालय, खडका आदी शाळा सहभागी झाल्या.

Last Updated : Dec 18, 2020, 6:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.