ETV Bharat / state

यंदा संत जनाबाई, मोतीराम महाराजांची 'हेलिकॉप्टरवारी'; परभणीत प्रशासकीय तयारी सुरू - aashadhi wari

गंगाखेडच्या संत जनाबाई आणि फळा येथील संत मोतीराम महाराज या दोन्ही संतांच्या पादुका आषाढी वारीच्या निमित्ताने हेलिकॉप्टरने पंढरपुरास जाणार आहे.

संत जनाबाई
संत जनाबाई
author img

By

Published : Jun 13, 2020, 1:37 PM IST

परभणी - जिल्ह्यातील गंगाखेडच्या संत जनाबाई आणि फळा येथील संत मोतीराम महाराज यांची नित्यनियमाने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणारी आषाढी वारी यंदा हेलिकॉप्टरने होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे पायी वारीला निर्बंध घातल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या दोन्ही संस्थानाची वारी अर्थात पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेण्यासाठीची प्रशासकीय तयारी सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्र हेलीकॉप्टर वारीचे संयोजक तथा गंगाखेड काँग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांना मिळाले आहे.

हेही वाचा - आषाढी वारी..! संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात

दरम्यान, या दोन्ही संतांच्या पादुका आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरास जाण्याचे आता निश्चित झाल्याने वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या संदर्भात गोविंद यादव व संत जनाबाई संस्थानचे मनोहर महाराज केंद्रे यांनी जिल्हा प्रशासनाकडे वारीला हेलिकॉप्टरने नेण्याची मागणी केली होती. त्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने मान्यता दिली असून, हेलिकॉप्टर वारीच्या संदर्भाने संबंधित सर्व यंत्रणेला पत्र पाठविली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हेलीपॅड बांधणीची जबाबदारी असते, तर वीज मंडळ आणि पोलीस प्रशासन सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडत असतात. या सर्व विभागांना अहवाल तातडीने सादर करण्याबाबतचे आदेश देखील अप्पर जिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी लेखी पत्राद्वारे दिले आहे. तसेच हेलिकॉप्टरमधून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वैद्यकीय तपासण्या आणि ई-पासेसही दाखल करण्याच्या सूचना गोविंद यादव यांना मिळाल्याची माहिती त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.

यंदा संत जनाबाई, मोतीराम महाराजांची हेलिकॉप्टरवारी

या अनुषंगाने पालम बांधकाम विभागाचे अधिकारी आज शनिवारी फळा येथे भेट देणार आहेत. गंगाखेड बांधकाम विभागालाही हे पत्र प्राप्त झाल्याची व त्या दृष्टीने तयारी सुरू केल्याची माहिती बांधकाम उपविभागाचे उपअभियंता सोनवणे यांनी दिली आहे. एकूणच, जिल्हा प्रशासनाच्या या तयारीमुळे जिल्ह्यातील प्रमुख संतांच्या पादुका आषाढी निमित्ताने पंढरपूरला जाण्याचे निश्चित झाल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. यासाठी काँग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, संत मोतीराम महाराज संस्थानचे मनोहर महाराज केंद्रे, संत जनाबाई संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख शिवाजी चौधरी, माजी नगरसेवक प्रविण काबरा, प्रमोद साळवे यांनी पुढाकार घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.