ETV Bharat / state

परभणीत प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पोलिसांनीही गिरवले योगासनाचे धडे

21 जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त शहरातील जिल्हा प्रशासन, योगदिन उत्सव समिती, महानगरपालिका, क्रीडा व शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी कार्यक्रम आयोजित केला होता.

योगा
author img

By

Published : Jun 21, 2019, 10:31 PM IST

परभणी - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात महसूल आणि पालिका प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर पोलीस मुख्यालयाच्या मैदानात पोलिसांनी देखील योग दिवस साजरा केला आहे. यावेळी अधिकारी, नागरिक, आणि योग प्रसाराचे कार्य करणाऱ्या संस्था यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

21 जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त शहरातील जिल्हा प्रशासन, योगदिन उत्सव समिती, महानगरपालिका, क्रीडा व शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी योग कार्यक्रम आयोजित केला होता.

योगा

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., महापालिका आयुक्त रमेश पवार, अप्पर जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपविभागीय अधिकारी डॉ.सुचिता शिंदे, तसेच विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, नागरिक, मुले-मुली उपस्थित होते.

या ठिकाणी योग शिक्षकांनी शरीर स्वास्थासाठी आवश्यक सर्व योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले आहे. योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इतर सर्वांनी योगासने केली आहेत. या कार्यक्रमास योग प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"पोलिसांचाही योग"
24-24 तास सेवा बजावणाऱया पोलिसांनी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर योगासनांचे धडे गिरवले आहेत. यावेळी योग शिक्षकांनी पोलिसांना निरोगी राहण्यासाठी व सततचा ताण कमी करण्यासाठी आवश्यक ती योगासने शिकवली आहेत. यात पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रविण मोरे, सर्व पोलिस निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Intro:परभणी - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त परभणी शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात महसूल आणि पालिका प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर पोलीस मुख्यालयाच्या मैदानात पोलीस जवानांनी योग साधला. यावेळी शहरातील शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यासह नागरीक, योग प्रसाराचे कार्य करणाऱ्या संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.Body:21 जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त परभणी येथे जिल्हा प्रशासन, योगदिन उत्सव समिती, महानगरपालिका, क्रीडा व शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., महापालिका आयुक्त रमेश पवार, अप्पर जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपविभागीय अधिकारी डॉ.सुचिता शिंदे, तसेच विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, नागरिक, मुले-मुली उपस्थित होते. या ठिकाणी योग शिक्षकांनी शरीर स्वास्थासाठी आवश्यक सर्व योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. तर त्यांच्या मार्गदर्शनात इतर सर्वांनी योगासने केली. या कार्यक्रमास योग प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"पोलिसांचाही योग"

या प्रमाणेच अनेक वेळा 24-24 ऑनड्युटी असणाऱ्या पोलिसांनी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर योगासनांचे धडे गिरवले. यावेळी योग शिक्षकांनी पोलिसांना निरोगी राहण्यासाठी व सततचा ताण कमी करण्यासाठी आवश्यक ते योगासने शिकवली. यात पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रविण मोरे, सर्व पोलिस निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- स्टेडियम मैदानावर योग करतानाचे फोटो व पोलिसांच्या योगासनाचे विझूव्हल्स.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.