परभणी - सोनपेठ तालुक्यातील उखळी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री एका किराणाच्या गोदामावर छापा टाकला. यात 3 लाख 18 हजारांच्या गुटख्यासह 5 लाख 18 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात एका आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथरी येथे गस्त घालत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ही माहिती मिळाली होती. त्यानुसार सोनपेठ तालुक्यातील उखळी बु. येथे बुधवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत 3 लाख 18 हजार 910 रुपयांच्या गुटख्यासह 5 लाख 18 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात पोलीस नाईक सय्यद मोबीन यांच्या फिर्यादीवरुन आरोपी प्रल्हाद जगन्नाथ सावंत याच्याविरोधात सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.