ETV Bharat / state

परभणीकर गारठले, तापमान 10.7 अंशांवर

परभणीत शनिवारी सकाळी 10.7 अंश सेल्सिअस इतके निचांकी तापमान नोंदविण्यात आले. वातावरणातील या बदलांचा आरोग्यासह पिकांवरही परिणाम जाणवेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

परभणीकर गारठले, तापमान 10.7 अंशांवर
परभणीकर गारठले, तापमान 10.7 अंशांवर
author img

By

Published : Feb 20, 2021, 10:18 AM IST

Updated : Feb 20, 2021, 11:07 AM IST

परभणी - गेल्या तीन दिवसांपासून पडणारा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे परभणी जिल्ह्यातील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. जिल्ह्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. याच्याच परिणामी शहरावर धुक्याची चादर पसरल्याचे चित्र शनिवारी सकाळी बघायला मिळाले. परभणीत शनिवारी सकाळी 10.7 अंश सेल्सिअस इतके निचांकी तापमान नोंदविण्यात आले. वातावरणातील या बदलांचा आरोग्यासह पिकांवरही परिणाम जाणवेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

परभणीकर गारठले, तापमान 10.7 अंशांवर

पुन्हा एकदा थंडीचा अनुभव
परभणीत शनिवारी सकाळपर्यंत 4.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शुक्रवारी 9.6 मिलीमीटर तर गुरूवारी 1.8 मिलीमीटर पावसाची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात झाली आहे. शुक्रवारी सकाळी 16 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर शनिवारी त्यात आणखीन घट होऊन किमान तापमान 10.7 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवत आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस

परभणी शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेपासून दुपारपर्यंत रिमझिम पाऊस पडला. तर गुरुवारीही जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली होती. परभणी तालुक्यातील पेडगाव आणि पाथरी तालुक्यातील काही भागात गारपीटही. यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. परिणामी शुक्रवारी दुपारपर्यंत परभणीकरांना सूर्यदर्शनच झाले नव्हते.

रबी पिकांना फटका -
यावर्षी खरीपातील समाधानकारक पावसामुळे रबी पिके जोमात आली होती. मात्र, आता अवकाळी पावसाचा रबी पिकांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. गुरुवारी झालेल्या गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परभणी, पाथरी व अन्य तालुक्यांच्या काही भागात गव्हाचे पीक आडवे झाले आहे. ज्वारीची कणसे भरली असून, त्यालाही या अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. शिवाय अनेक ठिकाणच्या फळबागांचेही नुकसान होणार असून वातावरण असेच राहिल्यास बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

संसर्गजन्य आजारांची भीती
गेल्या वर्षभरापासून नागरिक कोरोनाच्या संसर्गामुळे त्रस्त आहेत. त्यातच वातावरणातील बदल संसर्गजन्य आजारांसाठी पोषक असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात येते. वातावरणात प्रचंड प्रमाणात गारवा निर्माण झाला असून यामुळे सर्दी, खोकला, ताप आदी विकार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी तोंडाला मास्क लावूनच घराबाहेर पडावे. वारंवार सॅनिटायझरचा वापर करावा, घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे, सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून अंतर ठेवून राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

Last Updated : Feb 20, 2021, 11:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.