परभणी - देशातील डिझेल आणि पेट्रोल दरवाढीच्या तसेच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेने परभणीत जोरदार आंदोलन केले. यावेळी रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शिवसैनिकांनी जोडे मारले. इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरातील मैदानावर आज (शनिवारी) दुपारी जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आंदोलन केले.
'दानवेंविरोधात संताप'
भाजपने आणलेल्या किसान विधेयकाला विरोध करत देशभर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. एकीकडे शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती असताना दुसरीकडे भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाचा संबंध चीन व पाकिस्तानशी जोडण्याचे वक्तव्य केले होते. हे त्यांचे वक्तव्य बेताल असल्याची शिवसैनिकांनी प्रतक्रिया दिली आहे. संतप्त शिवसैनिकांनी दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त केला.
हेही वाचा-अन् शरद पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मुश्रीफांना अश्रू अनावर..!
' इंधन दरवाढीचा सर्वाधिक फटका परभणीला'
केंद्र सरकार सततची पेट्रोल व डिझेल दरवाढ करत असल्याने सामान्य जनतेस त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण देशात पेट्रोलचे दर हे परभणी जिल्ह्यामध्ये जास्त असल्याने परभणीकरांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळे परभणीकरांची भावना केंद्र सरकारपर्यंत पोचविण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी सांगितले.
हेही वाचा-'स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार'
शिवसेनेच्या आंदोलनात पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी
शिवसेनेच्या आंदोलन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे, अर्जुन सामाले, शेख शब्बीर, दीपक बारहाते, सदाशिव देशमुख, संजय गाडगे, नंदू अवचार, अनिल सातपुते, काशीनाथ काळबांडे, रमेश डख हे सहभागी झाले. त्याचबरोबर ज्ञानेश्वर पवार, मुंजाभाऊ कदम, जितेश गोरे, सखुबाई लटपटे, सविता मठपती, कुसुम पिल्लेवार, संजय सारणीकर, गजानन देशमुख हे सहभागी झाले. संतोष एकलारे, बंटी कदम, शाम कदम, विजयससिंह ठाकूर, विशू डहाळे, मकरंद कुलकर्णी, विकास वैजवाडे, प्रदीप भालेराव, रामदेव ओझा, विलास अवकाळे, संतोष आबेगावकर, सविता मठपती, शिवा यादव, शेख मुकेश, विष्णू मोहीते आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलन सहभागी झाले होते.