ETV Bharat / state

परभणीत पुन्हा काँग्रेसचा महापौर? आज होणार निवड, राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर!

author img

By

Published : Nov 22, 2019, 7:46 AM IST

शहर महानगरपालिकेत येणाऱ्या अडीच वर्षासाठी महापौर पदाची निवड आज शुक्रवारी होणार आहे. 65 नगरसेवक असलेल्या परभणी महापालिकेत काँग्रेसचे 30 सदस्य असून त्यांना केवळ तीन मतांची आवश्यकता आहे.

परभणी शहर महानगरपालिका

परभणी - शहर महानगरपालिकेत अडीच वर्षांसाठी महापौर पदाची निवड आज शुक्रवारी होणार आहे. 65 नगरसेवक असलेल्या परभणी महापालिकेत काँग्रेसचे 30 सदस्य असून त्यांना केवळ तीन मतांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्वतःचे सदस्य सहलीवर पाठवले होते. ते ऐनवेळी हजर होतील, तर काँग्रेसकडून राष्ट्रवादीचे 5 ते 6 सदस्य फोडले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Parbhani City Municipal Corporation
परभणी शहर महानगरपालिका

हेही वाचा... प्रशासनाने काश्मीरवरील निर्बंधांबाबत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावे - सर्वोच्च न्यायालय

परभणी महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया आज बी. रघुनाथ सभागृहात पार पडणार आहे. महापौर पद हे अनुसूचित जातीच्या महिला उमेदवाराला आरक्षित झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (18 नोव्हेंबर) महापौर पदासाठी 4 तर उपमहापौर पदासाठी 5 जणांचे उमेदवारी अर्ज आले आहेत. यामध्ये महापौर पदासाठी काँग्रेसच्या वतीने अनिता सोनकांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डॉ. वर्षा खिल्लारे, गवळणबाई रोडे तर भाजपच्या मंगला मुद्गलकर यांचा अर्ज दाखल आहे.

हेही वाचा... ...तर भाजपातून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग - राजू शेट्टी

उपमहापौर पदासाठी काँग्रेसच्यावतीने भगवान वाघमारे व महेबुब खान तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महेबुब अली पाशा, अली खान आणि भाजपच्या मुकूंद खिल्लारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष निवड प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. सुरुवातीच्या पंधरा मिनिटात उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर निवडणूक अधिकारी मतदान घेऊन नूतन महापौर व उपमहापौरांची घोषणा करतील.

हेही वाचा... शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत कमी - मकरंद अनासपुरे

दरम्यान, काँग्रेसच्या वतीने हे पद पुन्हा आपल्याकडेच राखण्याचा संपूर्ण प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश वरपूडकर यांनी आपले तीसही सदस्य गेल्या तीन दिवसांपासून अज्ञातस्थळी सहलीवर पाठवले आहेत. शिवाय त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांच्याशी झालेल्या हितसंबंधाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गटातील पाच ते सहा उमेदवार ते फोडण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे काँग्रेसचा महापौर निवडला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा... गुवाहाटी-मुंबई विमानाचे वैद्यकीय आपत्कालीन लँडिंगनंतर प्रवाशाचा मृत्यू, कारण अस्पष्ट

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरला, परंतु प्रत्यक्षात मात्र 'फिल्डिंग' लावण्यात ते कुठेतरी कमी पडले, असेच म्हणावे लागेल. कारण मतदान प्रक्रियेत शिवसेना नेहमीप्रमाणे तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता आहे, तर भाजपचे आठ सदस्य भाजप उमेदवार मंगला मुदगलकर यांना मतदान करतील, असे दिसून येते. एकूणच महापौर निवड प्रक्रिया स्पष्ट झाली असली तरी आता औपचारिकता बाकी आहे, असेच म्हणावे लागेल.

हेही वाचा... श्रीलंकेच्या नव्या सरकारसोबत काम करण्यास भारताची तयारी - परराष्ट्र मंत्रालय

दरम्यान, उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे सभागृह नेते भगवान वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचे सर्वपक्षीय सदस्यांसोबत असलेले संबंध पाहता इतर उमेदवारांनी दाखल केलेला अर्ज माघारी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपमहापौर पदाची निवड बिनविरोध पार पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Intro:परभणी - परभणी शहर महापालिकेत येणाऱ्या अडीच वर्षासाठी महापौर पदाची निवड आज (शुक्रवारी) होणार आहे. 65 नगरसेवक असलेल्या परभणी महापालिकेत काँग्रेसचे 30 सदस्य असून त्यांना केवळ तीन मतांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्वतःचे सदस्य सहलीवर पाठवले होते. ते ऐनवेळी हजर होतील तर काँग्रेसने राष्ट्रवादीचे 5 ते 6 सदस्य फोडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार काँग्रेसचा महापौर विराजमान होण्याची शक्यता आहे.
Body: परभणी महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया आज बी.रघुनाथ सभागृहात पार पडणार आहे. महापौर पद हे अनुसूचित जातीच्या महिला उमेदवाराला आरक्षित झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (18 नोव्हेंबर) महापौर पदासाठी 4 तर उपमहापौर पदासाठी 5 जणांचे उमेदवारी अर्ज आले आहेत. यामध्ये महापौर पदासाठी काँग्रेसच्यावतीने अनिता सोनकांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डॉ.वर्षा खिल्लारे, गवळणबाई रोडे तर भाजपच्या मंगला मुद्गलकर यांचा अर्ज दाखल आहे. याप्रमाणे उपमहापौर पदासाठी काँग्रेसच्यावतीने भगवान वाघमारे व महेबुब खान तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महेबुब अली पाशा, अली खान आणि भाजपच्या मुकूंद खिल्लारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आज सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष निवड प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. सुरूवातीच्या पंधरा मिनिटात उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर निर्वाचन अधिकारी मतदान घेऊन नूतन महापौर व उपमहापौरांची घोषणा करतील.
दरम्यान, काँग्रेसच्या वतीने हे पद पुन्हा आपल्याकडेच राखण्याचा संपूर्ण प्रयत्न केल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश वरपुडकर यांनी आपले तीसही सदस्य गेल्या तीन दिवसांपासून अज्ञातस्थळी सहलीवर पाठवले आहेत. शिवाय त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांच्याशी झालेल्या हितसंबंधाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गटातील पाच ते सहा उमेदवार ते फोडण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे काँग्रेसचा महापौर निवडला जाण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरला; परंतु प्रत्यक्षात मात्र फिल्डिंग लावण्यात ते कुठेतरी कमी पडले, असेच म्हणावे लागेल. कारण मतदान प्रक्रियेत शिवसेना नेहमीप्रमाणे तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता आहे, तर भाजपचे आठ सदस्य भाजप उमेदवार मंगला मुदगलकर यांना मतदान करतील, असे दिसून येते. एकूणच महापौर निवड प्रक्रिया स्पष्ट झाली असली तरी आता औपचारिकता बाकी आहे, असेच म्हणावे लागेल.
दरम्यान, उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे सभागृहनेते भगवान वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचे सर्वपक्षीय सदस्यांसोबत असलेले संबंध पाहता इतर उमेदवारांनी दाखल केलेला अर्ज माघारी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपमहापौर पदाची निवड बिनविरोध पार पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- photo & vis :- pbn_manapaConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.