ETV Bharat / state

गोकुळ-वृंदावन येथे देवदर्शनासाठी गेलेल्या परभणीतील व्यापारी दाम्पत्याचे  निधन

आर्य वैश्य कोमटी समाजातील व्यापारी जनार्दन मोदी (वय ७०) हे पत्नी मनोरमा (वय ६५) यांच्यासह गोकुळ-वृंदावन दर्शनासाठी गेले होते. मात्र, काल यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मथुरा येथे एका लॉजमध्ये मुक्कामास असताना या दोघांचे निधन झाले.

मोदी
author img

By

Published : Mar 10, 2019, 7:54 AM IST

परभणी - गोकुळ-वृंदावन येथे देवदर्शनासाठी गेलेल्या परभणीतील एका व्यापारी दाम्पत्याचे हृदयविकाराने निधन झाले. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी एका लॉजवर या दोघांचे मृतदेह पोलिसांना आढळून आले. त्यांचे पार्थिव आज (रविवार) सायंकाळपर्यंत परभणीत येणार आहे.

आर्य वैश्य कोमटी समाजातील व्यापारी जनार्दन मोदी (वय ७०) हे पत्नी मनोरमा (वय ६५) यांच्यासह गोकुळ-वृंदावन दर्शनासाठी गेले होते. मात्र, काल यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मथुरा येथे एका लॉजमध्ये मुक्कामास असताना या दोघांचे निधन झाले. तेथील परिस्थितीवरून पोलिसांनी हृदय विकारामुळे जनार्दन मोदी यांचे प्रथम निधन झाले, हा प्रकार पाहून घाबरलेल्या मनोरमा मोदी यांचे देखील धसकीने निधन झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती त्यांचा मुलगा गजानन मोदींना सांगितली. दोघांचे पार्थिव रविवारी विमानाने हैदराबाद येथे आणण्यात येणार आहेत, तेथून दुपारपर्यंत परभणीत पोहोचतील, असे सांगण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, असा परिवार आहे. मोदी यांचे राहते घर गजानन नगर, कारेगाव रोड येथे आहे. ए-वन मार्केटमध्ये त्यांचे कापडाचे दुकान आहे. दरम्यान, मोदी दाम्पत्यावर सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

Intro:परभणी - गोकुळ-वृंदावन येथे देवदर्शनासाठी गेलेल्या परभणीतील एका व्यापारी दाम्पत्याचे हृदयविकाराने निधन झाले. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी एका लॉजवर ते दोघेही मृत अवस्थेत पोलिसांना आढळून आले. त्यांचे पार्थिव आज, रविवारी सायंकाळपर्यंत परभणीत येणार आहे.Body:आर्य वैश्य कोमटी समाजातील व्यापारी जनार्दन मोदी (७०) हे पत्नी मनोरमा (६५) यांच्यासह गोकुळ-वृंदावन दर्शनसाठी गेले होते. मात्र काल यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मथुरा येथे एका लॉज मध्ये मुक्कामास असताना या दोघांचे पण दुर्दैवी निधन झाले. तेथील परिस्थितीवरून पोलिसांनी हृदय विकारामुळे जनार्दन मोदी यांचे प्रथम निधन झाले, हा प्रकार पाहून घाबरलेल्या मनोरमा मोदी यांचे देखील धसकीने निधन झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती त्यांचे चिरंजीव गजानन मोदी यांना पोलिसांनी कळवली. दोघांचे पार्थिव रविवारी विमानाने हैदराबाद येथे आणण्यात येणार आहेत, तेथून दुपारपर्यंत परभणीत पोहचतील, असे सांगण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुलं, एक मुलगी, असा परिवार आहे. मोदी यांचे राहते घर गजानन नगर, कारेगाव रोड येथे असून ए-वन मार्केट मध्ये त्यांचे कापडाचे दुकान आहे. दरम्यान, मोदी दाम्पत्यावर सायंकाळी 5 वाजता वैकुंठधाम समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत: photoConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.