ETV Bharat / state

गंभीर : परभणीत दोन हजार रक्त पिशव्यांचा तुटवडा - Blood bank in parbhani

परभणी जिल्ह्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी 2 हजार रक्त पिशव्यांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. रक्तसाठा भरून काढण्यासाठी शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून देखील रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गतवर्षी 8 हजार 395 एवढ्या रक्त पिशव्यांचे परभणी जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढी संकलन झाले होते. मात्र, यंदा आत्तापर्यंत केवळ 6 हजार 435 एवढ्याच रक्तपिशव्याचे संकलन झाले आहे.

parbhani bloparbhani blood deficiencyod deficiency
परभणीत दोन हजार रक्त पिशव्यांचा तुटवडा
author img

By

Published : Dec 18, 2020, 4:55 PM IST

परभणी - गंभीर परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असणाऱ्या रक्ताच्या साठयाचा यंदा संपूर्ण राज्यातच तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सुद्धा देखील गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी 2 हजार रक्त पिशव्यांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. हा रक्तसाठा भरून काढण्यासाठी शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून देखील रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसात परभणी जिल्ह्यात 10 शिबिरे झाली असून, त्या माध्यमातून सुमारे 400 रक्ताच्या पिशव्या गोळा झाल्या आहेत. तर येणाऱ्या दोन दिवसात देखील 400 ते 500 रक्तपिशव्या शिबिरांच्या माध्यमातूनच गोळा होणार असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे.

परभणीत दोन हजार रक्त पिशव्यांचा तुटवडा

रक्ताची कमतरता हा संपूर्ण राज्याचाच प्रश्न झाला आहे. त्यातल्या त्यात कोरोना सारख्या महामारीत रक्ताची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासली होती. त्यामुळे सहाजिकच रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा संपून गेला. नेहमीप्रमाणे कोरोना काळात रक्तदान शिबिरे झालीच नाहीत. रक्तदाते देखील रक्तदानासाठी न आल्याने हा रक्तसाठा चार ते पाच दिवस पुरेल एवढ्या गंभीर परिस्थितीवर येऊन पोहोचला होता. परभणीत देखील हीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

रक्तपेढ्यांमध्ये शिल्लक केवळ 2 ते 5 रक्तपिशव्या -

जिल्हा रुग्णालयातील मुख्य रक्तपेढीसह शहरात गुरुगोबिंदसिंह आणि लाईफलाईन अशा तीन रक्तपेढी आहेत. या रक्तपेठ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात रक्तदानाचे शिबिरे आयोजित करण्यात येतात. या तीनही रक्तपेढ्यांमध्ये मागच्या चार दिवसांखाली अत्यंत गंभीर म्हणजेच 2 ते 5 रक्तपिशव्या शिल्लक राहिल्या होत्या. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी रक्तदानाचे आवाहन केले आहे.

गेल्या वर्षी 8 हजार 395 रक्त पिशव्याचे संकलन -

गतवर्षी 8 हजार 395 एवढ्या रक्त पिशव्यांचे परभणी जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढी संकलन झाले होते. मात्र, यंदा आत्तापर्यंत केवळ 6 हजार 435 एवढ्याच रक्तपिशव्याचे संकलन झाले आहे. म्हणजे गेल्यावर्षीपेक्षा 2 हजार रक्त पिशव्यांचा तुटवडा यावर्षी निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाकडून प्रयत्न करून गेल्या चार दिवसांत झालेल्या रक्तदान शिबिरांमधून चारशेहुन अधिक रक्तपिशव्या गोळा झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सुरवसे यांनी दिली. तसेच येणाऱ्या दोन ते तीन दिवसात परभणीसह मानवत, पाथरी, पालम, सोनपेठ आदी भागात रक्तदान शिबिरे होत आहेत. त्या माध्यमातून सुद्धा चारशे ते पाचशे रक्तपिशव्या गोळा होणार असल्याचेही डॉ. सुरवसे म्हणाले.

लोकप्रतिनिधींकडून रक्तदान शिबिराचे आयोजन -

परभणीत निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्यामुळे अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी देखील रक्तदान करण्याचे आवाहन करत आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी रक्तदान शिबीरांचे नियोजन करत आहेत. त्यानुसार आज (शनिवारी) देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार आणि दिवंगत माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडी सरकारच्या घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांची ठिकठिकाणी शिबिरे होत आहेत. तर 'लॉकडाऊनमध्ये रक्तदान शिबिर घेऊन 900 पिशव्यांचे संकलन करत शिवसेनेने जिल्हा रुग्णालयाला तो रक्तपुरवठा केला होता. त्याप्रमाणे येत्या दोन ते तीन दिवसात आणखी एका मोठ्या रक्तदान शिबिराचे नियोजन केल्याची माहिती आमदार डॉ.राहुल पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलतांना दिली.

हेही वाचा - टीआरपी घोटाळा : कुठपर्यंत गेला मुंबई पोलिसांचा तपास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.