ETV Bharat / state

परभणीत 'रेमडेसिवीर'चा काळाबाजार करणाऱ्यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी

परभणी शहरातील बसस्थानक परिसरातील हाके मेडीकलविरूध्द काल (बुधवारी) रात्री महसूल आणि औषधी प्रशासनाच्या संयुक्त पथकाने सापळा रचून कारवाई करत दुकानाला सील ठोकले होते. मेडिकलच्या मालक आणि नोकर अशा दोघांना न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मेडिकलला सील ठोकले
मेडिकलला सील ठोकले
author img

By

Published : Apr 8, 2021, 7:08 PM IST

परभणी - 'कोरोना'च्या संसर्ग काळात महत्त्वपूर्ण अशा 'रेमडेसिव्हीर' या इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या परभणीतील हाके मेडिकलच्या मालक आणि नोकर अशा दोघांना न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काल (बुधवारी) रात्री 10 वाजता उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर यांनी सापळा रचून सदर दुकानदारावर कारवाई केली होती. त्यानंतर आज (गुरुवारी) या व्यापारी आणि त्याच्या नोकरास न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी दिली.

परभणी शहरातील बसस्थानक परिसरातील हाके मेडीकलविरूध्द काल (बुधवारी) रात्री महसूल आणि औषधी प्रशासनाच्या संयुक्त पथकाने सापळा रचून ही कारवाई करत दुकानाला सील ठोकले होते. तर सदर दुकानदार विजय हाके आणि त्यांचा नोकर रवि इघारे या दोघांना नवामोंढा पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

मेडिकल लाईनमध्ये लावला होता सापळा

शहरातील बस स्थानकाजवळील मेडिकल लाईनमध्ये असलेल्या काही मेडिकलमध्ये कोरोनासाठी लागणार्‍या रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी सायंकाळी 7.30 वाजल्यापासून त्या ठिकाणी दबा धरून तेथील ग्राहकांवर पाळत ठेवली होती. यावेळी हाके मेडिकलचा चालक 4 हजार 200 रुपयांचे इंजेक्शन 6 हजार रुपयांना विक्री करत असल्याचे आढळून आले.

जादा दराने केली जात होती विक्री

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा होता. त्यामुळे 5 एप्रिल रोजी जिल्ह्याला 600 इंजेक्शन उपलब्ध झाले होते. अनेक मेडिकल दुकानदारांकडे इंजेक्शन उपलब्ध असताना प्रत्यक्षात अनेक मेडिकल दुकानदारांनी हे इंजेक्शन लपवून ठेवले होते. ओळखीच्या ग्राहकांना तसेच ज्यादा दर देणार्‍या ग्राहकांनाच विक्री करत असल्याने अनेक गोरगरीब रुग्ण या इंजेक्शनपासून वंचित राहू लागले.

जिल्हा प्रशासनाची थेट कारवाई

त्यामुळे याप्रकरणी बुधवारी रात्री जिल्हा प्रशासनाने थेट कारवाई करून औषध प्रशासनाचे निरीक्षक बळीराम मरेवार यांच्या मार्फत नवामोंढा पोलिस ठाण्यात सदर मेडिकल चालक विजय हाके व रवी इघारे हे दोघे जण संगणमत करून रेमडेसिवीर हे इंजेक्शन जीवनावश्यक वस्तू आहे, हे माहीत असतानाही त्यावरील छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करत असल्याची तक्रार दिली. तसेच शासनाने घालून दिलेल्या किंमत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यामुळे मेडीकल चालक विजय हाके आणि रवि इघारे या दोघांना नवा मोंढा पोलिसांनी अटक करून आज (गुरुवारी) न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 15 एप्रिलपर्यंत (8 दिवस) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.