ETV Bharat / state

परभणीत पुन्हा ऑक्सिजन प्लॅन्टचा पाईप फुटला; पर्यायी व्यवस्थेमुळे अनर्थ टळला - oxygen bed in parbhani

शहरातील जिल्हा परिषदेच्या इमारतीमधील कोविड सेंटरमध्ये घडली आहे. या ठिकाणच्या ऑक्सिजन प्लॅन्टमधील एक पीयूसी पाईप आज (शनिवारी) सायंकाळी अचानक फुटल्याने गोंधळ उडाला. परंतु वेळीच पर्यायी पाईपमधून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केल्याने मोठा अनर्थ टळला.

परभणीत ऑक्सिजन प्लॅन्ट
परभणीत ऑक्सिजन प्लॅन्ट
author img

By

Published : May 22, 2021, 9:18 PM IST

परभणी - येथील जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅन्टचा पाईप फुटल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. अशीच घटना आता शहरातील जिल्हा परिषदेच्या इमारतीमधील कोविड सेंटरमध्ये घडली आहे. या ठिकाणच्या ऑक्सिजन प्लॅन्टमधील एक पीयूसी पाईप आज (शनिवारी) सायंकाळी अचानक फुटल्याने गोंधळ उडाला. परंतु वेळीच पर्यायी पाईपमधून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केल्याने मोठा अनर्थ टळला.

पर्यायी यंत्रणेमुळे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत -

दरम्यान, प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, सदर ऑक्सिजन प्लॅन्टचा पीयूसी पाईप सायंकाळी अचानक फुटून त्यातून धुर बाहेर निघाला. त्यानंतर सेंटरवरील तज्ञासह कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. आणि त्या पाईपचा पुरवठा तात्काळ बंद केला. तेथून तो पाईप हटवला आणि तोपर्यंत ऑक्सिजन पुरवठा करणारी पर्यायी यंत्रणा कार्यान्वित केली. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहिला.

परभणीत ऑक्सिजन प्लॅन्ट
परभणीत ऑक्सिजन प्लॅन्ट

तापमान वाढल्यामुळे पाईप फुटल्याचा संशय -

सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. याच वाढलेल्या तापमानामुळे सदर ऑक्‍सिजनचा पाईप फुटल्याचा अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केला आहे आहे. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता. तसेच रुग्णालय प्रशासनाने पुढील अनर्थ टाळण्यासाठी अग्निशमन दलाला देखील पाचारण केले होते. घटनास्थळी आलेल्या अग्निशामन दलाच्या बंबामुळे तसेच पोलीस ताफ्यामुळे देखील मोठी घटना घडल्याची अफवा शहरात पसरली होती. परंतु प्रत्यक्षात केवळ पाईप फुटल्याने हा गोंधळ उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.

'सायलेन्सरमध्ये ब्लास्ट झाल्याने दूर निघाला' -

परभणीच्या जिल्हा परिषदेतील कोविड हॉस्पिटलमध्ये 14 मे रोजी हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करणारा ऑक्सिजन प्लॅन्ट बसविण्यात आला आहे. मात्र या प्लॅन्ट मधून आवाज येत असल्याने आज त्या ठिकाणी सायलेन्सर बसविण्यात आले. मात्र, हे सायलेन्सर कार्यान्वित झाल्यानंतर त्याचा ब्लास्ट झाला आणि त्यातून काही प्रमाणात धूर निघाला. त्यामुळे तात्काळ हा प्रकल्प थांबवून त्या ठिकाणच्या लिक्विंड ऑक्सिजन प्रकल्पांमधून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही रुग्णाला त्रास झाला नाही किंवा ऑक्सिजनची कमतरता भासली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांसह खासदार-आमदार ही धावून आले -

यापूर्वी देखील जिल्हा रुग्णालयात पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हवेतून लटकणाऱ्या ऑक्सिजनचा पाईप तुटला होता. त्यावेळी देखील ऑक्सिजन लीक होत असल्याने वेळीच शहरातील एका तरुणाने धाव घेऊन ही पाईपलाईन सुरळीत केली होती. त्यामुळे त्यावेळी देखील मोठा अनर्थ टळला. ही घटना ताजी असल्याने आजच्या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे हे घटनेची माहिती कळताच घटनास्थळी धावून आले. तात्काळ संपूर्ण इमारतीची पाहणी करून त्यांनी सर्व यंत्रणा व्यवस्थित आहे की नाही, याची चौकशी केली. विशेष म्हणजे ऑक्सिजन प्लॅन्टसाठी 24 तास सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. मग, असे असताना अशी घटना घडलीच कशी? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.