ETV Bharat / state

परभणीत उष्माघाताचा चौथा बळी; चारठाणा येथे वृद्धाचा मृत्यू - jintur

परभणी जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात चार वृद्धांचा उष्माघाताने बळी गेला आहे.

कुंडलिक खाडे
author img

By

Published : May 28, 2019, 12:17 PM IST

परभणी - जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे वयोवृद्ध व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला. कुंडलिक भिवाजी खाडे (वय ६०), असे या वयोवृद्धाचे नाव आहे. जिल्ह्यातील उष्माघाताचा हा चौथा बळी आहे.

परभणीत उन्हामुळे रस्त्यावर पाहायला मिळणारा शुकशुकाट

खाडे हे सोमवारी नेहमीप्रमाणे आपल्या हेअर कटिंग सलूनमध्ये दैनंदिन काम करत होते. त्यांना दुपारी अचानक उष्माघाताचा त्रास सुरू झाला. त्यांच्यावर प्रथोमपचार करण्यापूर्वीच त्रास वाढल्याने त्यांचा दुकानातच मृत्यू झाला. यामुळे चारठाणा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

खाडे यांच्या मृत्यूनंतर उष्माघाताने मरण पावणाऱ्यांची संख्या चार झाली आहे. यापूर्वी सोनपेठ, गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

Intro:परभणी - परभणी जिल्ह्यात एप्रिल महिण्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा कहर होत आहे. चाळीस अंशांच्या खाली तापमान आले नसूूून सध्या तर तापमानाने 45 अंशाच्या वरच मुक्काम ठोकला आहे. याचा परिणाम वृद्ध नागरिकांवर होत असून गेल्या दीड महिन्यात परभणी जिल्ह्यातील चार वृद्धांचा उष्माघाताने बळी गेला आहे. यात काल सोमवारी जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे एका 60 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला.Body:चारठाणा येथील नाभिक समाजाचे कुंडलिक भिवाजी खाडे (६०) सोमवारी नेहमीप्रमाणे आपल्या हेअर कटिंग सलूनमध्ये दैनंदिन काम करीत होते. त्यांना दुपारी अचानक उष्माघाताचा त्रास सुरू झाला. परंतु त्यांच्यावर काही प्रथोमपचार होईपर्यंत हा उष्माघाताचा त्रास वाढत गेला. त्यानंतर काही वेळातच त्यांचा दुकांनातच मृत्यू झाला. यामुळे चारठाणा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, उष्माघाताने मरण पावणाऱ्यांची संख्या चार झाली आहे. यापूर्वी सोनपेठ, गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यातील उष्माघाताचा हा चौथा बळी आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- फोटो - कुंडलिक खाडे &
- vis - प्रचंड उन्हामुळे दुपरच्यावेळी गंगाखेड शहरातील या गजबजलेल्या चौकात असा शुकशुकात निर्माण झाला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.