ETV Bharat / state

परभणी जिल्ह्यातील देवगाव फाट्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविले; १ ठार तर १ गंभीर

सेलू तालुक्यातील देवगावफाट्यापासून १ किमी अंतरावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना उडवले. यात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला आहे. तर, त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे.

परभणी जिल्ह्यातील देवगाव फाट्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविले ; १ ठार, १ गंभीर
author img

By

Published : May 17, 2019, 10:10 PM IST

परभणी - सेलू तालुक्यातील देवगावफाट्यापासून १ किमी अंतरावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना उडवले. यात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला आहे. तर, त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. एकनाथ रोडगे (वय ४५ रा. रवळगांव ता.सेलू) असे या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

एकनाथ रोडगे हे जानकिराम बाबाराव चव्हाण (वय ४५ रा. पिंपळगाव काजळे ता.जिंतूर) यांच्या सोबत दुचाकीवरून गुरुवारी रात्री १० वाजता देवगाव फाट्यावरून जात होते. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला (एम.एच. २०, ए.डी. ५३६०) उडविले. हा अपघात एवढा भीषण होता, की दुचाकीवरील एकनाथ रोडगे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, जानकिराम चव्हाण हे गंभीर जखमी झाले.

one Died in Bike Accident in parbhani District
मृत- एकनाथ रोडगे
bike accident
अपघातग्रस्त दुचाकी

महामार्ग पोलीस उपनिरीक्षक पांडे तथा अन्य कर्मचारी आणि चारठाणा पोलीसांनी जखमी जानकिराम चव्हाण यांना मंठा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर, एकनाथ रोडगे यांचा मृतदेह सेलू उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, सेलू शहरात व तालुक्यात अपघाताचे सत्र सुरू असून गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अपघातात वाढ झाली आहे. ग्रामीण भागात अपघाताचे प्रमाण शहरी विभागाच्या तुलनेत अधिक झाले आहे.

Intro:परभणी - सेलू तालुक्यातील देवगावफाट्यापासून 1 किमी अंतरावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना उडवले. यात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला असून त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहेBody:एकनाथ रोडगे (वय 45 रा.रवळगांव ता.सेलू) असे या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते जानकिराम बाबाराव चव्हाण (वय 45 रा. पिंपळगाव काजळे ता.जिंतूर) यांच्या सोबत दुचाकीवरून गुरुवारी रात्री १० वाजता देव गाव फाट्यावरून जात होते. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकल (एम.एच. 20, ए.डी. 5360) दुचाकीला उडविले. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील एकनाथ रोडगे यांचा जागीच मृत्यू झाला. तर जानकिराम चव्हाण हे गंभीर जखमी झाले. महामार्ग पोलीस उपनिरीक्षक पांडे तथा अन्य कर्मचारी व चारठाणा पोलीसांनी जखमी जानकिराम चव्हाण यांना मंठा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तर एकनाथ रोडगे यांचा मृतदेह सेलू उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे. दरम्यान, सेलू शहरात व तालुक्यात अपघाताचे सत्र सुरू असून गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अपघातात वाढ झाली आहे. ग्रामीण भागात अपघाताचे प्रमाण शहरी विभागाच्या तुलनेत अधिक आहे.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- अपघाताचे फोटो.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.