ETV Bharat / state

परभणीत टिप्पर-दुचाकीच्या धडकेत ग्रामसेवक ठार, एक जखमी - Giriraj Bhagat

गंगाखेड रोडवरील पिंगळगड नाल्याजवळ टिप्पर आणि दुचाकीची धडक होऊन यात ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जखमी झाला आहे. जखमीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळचे छायाचित्र
author img

By

Published : Jun 26, 2019, 11:05 AM IST

Updated : Jun 26, 2019, 12:23 PM IST

परभणी - गंगाखेड रोडवर पिंगळगड नाल्याजवळ टिप्पर आणि दुचाकीची धडक होऊन यात ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ग्रामसेवकासोबत असलेला एक व्यक्ती जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळावरील दृश्य

दिलीपराव सोनराव देशमुख (वय ५४ वर्ष), असे अपघातात मृत झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. ते परभणी पंचायत समितीमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. सोमवारी दुपारी ते गंगाखेड रोडवरून परभणीकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. यात चाकाखाली आलेल्या देशमुख यांच्या जागेवरच चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला. तर सोबतचा व्यक्ती जखमी झाला असून त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातामुळे परभणी-गंगाखेड रस्त्यावरील वाहतूक बराच काळ खोळंबली होती. तर टिप्पर चालक घटनास्थळापासून फरार झाला असून, कोतवाली पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी संध्याकाळी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.

Intro:परभणी - गंगाखेड रोडवर पिंगळगड नाल्याजवळ एका टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच ग्रामसेवकासोबत असलेला एक इसम जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Body:या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव दिलीपराव सोनराव देशमुख (वय 54 वर्ष) असे असून ते परभणी पंचायत समिती मध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. आज सोमवारी दुपारी ते गंगाखेड रोडवरून परभणीकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या टिप्परने जोरदार धकड दिली. यात चाकाखाली आलेल्या देशमुख यांच्या जागेवरच चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला. तर सोबत चा इसम जखमी असून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातामुळे परभणी-गंगाखेड रस्त्यावरील वाहतूक बराच काळ खोळंबली होती. तर टिप्पर चालक घटनास्थळापासून फरार झाला असून, कोतवाली पोलीस त्याचा शोध घेत आहेत, या प्रकरणी संध्याकाळी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- vis. Conclusion:
Last Updated : Jun 26, 2019, 12:23 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.