ETV Bharat / state

परभणीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या परिचारिकेसह एकाला अटक - परभणी रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार बातमी

सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती भयंकर होत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परभणीमध्ये या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एका परिचारिकेसह एका आरोपीला अटक करण्यात आले आहे.

Remdesivir injection black marketing
Remdesivir injection black marketing
author img

By

Published : Apr 20, 2021, 8:00 PM IST

परभणी - गंभीर रुग्णांच्या शरिरातील कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या 'रेमडेसिवीर' या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. खाजगी व्यवसायिकांसोबतच जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी देखील या काळ्या धंद्यात सहभागी असल्याचा प्रकार परभणीत उघडकीस आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज (मंगळवारी) जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिकेसह अन्य एका व्यक्तीला अटक केली आहे. या परीचारिकेने जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधून सात रेमडेसिवीरचे इंजेक्शन चोरून ते काळ्या बाजारात विकल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुप्त माहितीवरून रचला सापळा -

या प्रकरणी मिळालेल्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी सापळा रचला होता. त्यानुसार पोलीस शिपाई संतोष सानप यांनी ठरल्याप्रमाणे इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या व्यक्तीला भेटून 'माझा नातेवाईक कोरोनाचा रुग्ण असून, तो गंभीर आहे. त्याला इंजेक्शनची गरज आहे', असे विश्वासात घेऊन बोलणी केली. आरोपीने पंधरा हजार रुपये किमतीला एक इंजेक्शन असून, तीस हजार रुपयात दोन इंजेक्शन घेऊन येतो, असे सांगितले. त्यानंतर पोलीस शिपाई सानप यांनी ही माहिती व्यंंकटेश आलेवार यांना कळवली.

दोन रेमडेसिवीर इंजेक्शन आणि एक मोबाइल हस्तगत -

मिळालेल्या माहिती वरून पोलीस पथक 2 दोन पंचासह शहरातील बेलेश्वर मंदिराजवळ दबा धरून बसले. तांत्रिक सहाय्य करण्याबाबत सायबर पोलीस कक्षाच्या कर्मचाऱ्याला सांगितले होते. त्यानुसार आज दुपारी आरोपी व्यक्ती बेलेश्वर मंदिराजवळ पायी चालत आला. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. आरोपीचे नाव दत्ता शिवाजी भालेराव (वय 21 वर्षे) असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून दोन रेमडेसिवीर इंजेक्शन, एक मोबाईल हस्तगत करण्यात आला.

आतापर्यंत 7 इंजेक्शन चोरल्याची दिली कबुली -

पोलिसांनी आरोपीची चौकशी केली. हे इंजेक्शन काळ्या बाजारात विक्रीसाठी कोणाकडून आणले, असे विचारले असता, त्याने सिव्हिल हॉस्पिटल येथील परिचारिका नीता केशव काळे हिच्याकडून बारा हजार रुपयांना एक इंजेक्शन घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ परिचारिका नीता काळे हिला ताब्यात घेतले. तिच्या खोलीची झडती घेतली असता, 75 हजार रुपये रोख रक्कम सापडली. तसेच तिने आतापर्यंत 7 इंजेक्शन जिल्हा परिषद सेंटर येथून चोरल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या ती त्याच कोविड सेंटरला काम करत होती. तिच्याकडून देखील एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात औषध निरीक्षक बळीराम मरेवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.