ETV Bharat / state

शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाकरिता कृषी संशोधनाला पर्याय नाही - राजेंद्र पवार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या संशोधन कार्याची माहिती घेण्‍याकरिता आज (गुरुवारी) परभणीत आले होते. या ठिकाणी झालेल्या छोटेखाणी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.दत्‍तप्रसाद वासकर यांनी विद्यापीठ संशोधन कार्याची माहिती दिली.

राजेंद्र पवार
राजेंद्र पवार
author img

By

Published : Dec 17, 2020, 10:28 PM IST

परभणी - शेती व शेतकरी विकासाकरिता कृषी संशोधनाला पर्याय नाही. मर्यादित निधीमुळे संशोधनाचा प्राधान्‍यक्रम आपणास ठरवावा लागतो. तसेच आहारात बाजरी, ज्‍वारी, जवस आदी दुय्यम कडधान्‍याचे महत्‍व वाढत असतांना परभणीच्या कृषी विद्यापीठाने या पिकांचे चांगले वाण विकसित केले आहेत. तुरीचा बीडीएन ७११, ज्‍वारीचे परभणी सुपर मोती, परभणी शक्‍ती, करडईचे पीबीएनएस १२ हे वाण चांगले उत्‍पादनक्षम आहे. त्यामुळे कोरडवाहु शेतकरी बांधवाचे उत्‍पन्‍न वाढण्‍यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन बारामती बारामती कृषी विकास प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष राजेंद्र पवार यांनी केले.

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या संशोधन कार्याची माहिती घेण्‍याकरिता आज (गुरुवारी) परभणीत आले होते. या ठिकाणी झालेल्या छोटेखाणी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.दत्‍तप्रसाद वासकर यांनी विद्यापीठ संशोधन कार्याची माहिती दिली. भेटी दरम्‍यान शिक्षण संचालक डॉ.धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्राचार्य डॉ.जयश्री झेंड, प्राचार्य डॉ.अरविंद सावते, प्रगतशील शेतकरी संभाजीराव धांडे, बारामती कृषि विज्ञान केंद्राचे डॉ.संतोष कारंजे, के.टी.जाधव आदींसह विद्यापीठातील संशोधक व अधिकारी उपस्थित होते.

'सौर उर्जावरील अवजारांचा शेतकरी बांधवाना लाभ'-

यावेळी बोलताना राजेंद्र पवार म्‍हणाले की, पश्चिम महाराष्‍ट्रातील कोरडवाहु क्षेत्रात परभणी विद्यापीठ विकसित अनेक कृषी तंत्रज्ञानाचा चांगला लाभ होऊ शकतो. विद्यापीठाने शेतकरी बांधवाच्‍या गरज लक्षात घेऊन विकसित कृषी अवचारे व यंत्रे यात बैलचलित तसेच सौर उर्जावरील अवजारे, बीबीएफ यंत्र याचा निश्चितच शेतकरी बांधवाना लाभ होणार आहे. परभणी येथील गृहविज्ञानाशी संबंधीत एकमेव सामुदायिक विज्ञान महाविद्यालय ग्रामीण महिला, बालविकास व किशोरवयीन मुलींच्‍या विकासाकरिता कार्य करत आहे. विद्यापीठ विकसित कृषी तंत्रज्ञान जास्‍तीत जास्‍त शेतकऱ्यापर्यंत चांगल्‍या प्रकारे पोहचले पाहिजे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

'विविध प्रकल्पांना दिली भेट'-

यावेळी पवार यांनी विद्यापीठातील कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्प, पशुशक्‍तीचा योग्‍य वापर प्रकल्‍प, बायोमिक्‍स प्रकल्‍प, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, अन्‍नतंत्र महाविद्यालय आदी प्रकल्‍पास भेट देऊन संशोधनाची माहिती घेतली. भेटी दरम्‍यान बांबु लागवड संशोधनाबाबत डॉ.डब्लु.एन. नारखेडे, कुपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञानाबाबत डॉ.मदन पेंडके, पशुशक्‍तीचा योग्‍य वापर तंत्रज्ञान व कृषी अवजाराबाबत डॉ.स्मिता सोळंकी, सौर उर्जेचे वापराबाबत डॉ.राहुल रामटेके, गृहविज्ञान तंत्रज्ञानाबाबत डॉ.जयश्री झेंड, प्रक्रिया अन्‍न पदार्थाबाबत डॉ.अरविंद सावते, विद्यापीठ विकसित बॉयोमिक्‍स बाबत डॉ.कल्‍याण आपेट यांनी माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ.ऋषिकेश औंढेकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील संशोधक व अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा- ड्रग प्रकरण : चित्रपट दिग्दर्शक करण जोहरला एनसीबीकडून समन्स

हेही वाचा- लसीकरणाला लवकरच सुरुवात, केंद्राने लस मोफत द्यावी- राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.