ETV Bharat / state

गरजूंना धान्याची किट देवून परभणीच्या 'या' नवदाम्पत्याने केला गृहप्रवेश - parbhani married couple helps poor

शहरातील शंकर नगरात राहणाऱ्या किरण प्रकाशराव सपाटे या तरुणाचा विवाह नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील शितल कचरू केळकर हिच्याशी पार पडला. नववर-वधूने अनेक तांत्रिक व प्रशासकीय अडचणी पार पाडत अखेर रेशीमगाठी बांधल्या.

parbhani marriage news  parbhani newly married couple  parbhani married couple helps poor  परभणी नवदाम्पत्यांची गरजूंना मदत
गरजूंना धान्याच्या किट देवून परभणीच्या 'या' नवदाम्पत्याने केला गृहप्रवेश
author img

By

Published : May 7, 2020, 8:45 AM IST

Updated : May 7, 2020, 12:33 PM IST

परभणी - लॉकडाऊनमुळे दोन वेळा लांबलेला विवाह अत्यंत साध्या पध्दतीने उरकून वाचलेल्या पैशातून बेघरांना अन्नधान्य व मास्कचे वाटप करत परभणीच्या एक नवदाम्पत्याने गृहप्रवेश केला. कोरोनाच्या भीतीने केवळ सात वऱ्हाड्यांच्या साक्षीने शेतात रेशीमगाठी बांधून त्यांनी नवजीवनाला सुरुवात केली.

गरजूंना धान्याच्या किट देवून परभणीच्या 'या' नवदाम्पत्याने केला गृहप्रवेश

शहरातील शंकर नगरात राहणाऱ्या किरण प्रकाशराव सपाटे या तरुणाचा विवाह नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील शितल कचरू केळकर हिच्याशी पार पडला. नववर-वधूने अनेक तांत्रिक व प्रशासकीय अडचणी पार पाडत अखेर रेशीमगाठी बांधल्या.

दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी किरणचा विवाह शितलशी ठरला होता. त्यानुसार ६ एप्रिल ही तारीख विवाहासाठी निश्‍चित झाली होती. त्यानंतरही 1 मे ही तारीख निश्‍चित करण्यात आली होती. मात्र, लॉकडाऊन वाढतच गेले आणि या विवाह सोहळ्याता मुहूर्त गाठता येत नव्हता. त्यामुळे किरणने आपला मित्र तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचा जिल्हा सरचिटणीस कृष्णा कटारे याच्याशी चर्चा केली. त्यानंतर विवाहासाठी 2 मे रोजी ऑनलाईन अर्ज प्रशासनाकडे दाखल केला. मात्र, जिल्हा प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारली होती. त्यामुळे प्रशासनाला सर्व प्रकारची तपासणी, सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझेशन आदी बाबींची पूर्तता करण्याची हमी देवून परवानगी मिळवली. त्यानुसार किरण, कृष्णा कटारे व कुणाल गायकवाड या तिघांनीही स्वतःची कोरोना चाचणी केली, तर मुदखेडमध्ये नवरी मुलगी शितलचीही कोरोना तपासणी करण्यात आली. त्याचे अहवाल आल्यानंतर प्रशासनाने दिलेल्या परवानगीनुसार पोलीस पाटील, सरपंच, मुलीचे आई-वडील व मुलाच्या दोन मित्रांसह हा सोहळा रोहीपिंपगळगाव येथील शेतात नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने झाला. त्यानंतर परभणीत आलेल्या या नवदाम्पत्याने परभणीत पुन्हा एकदा स्वतःची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर वऱ्हाड्यांच्या जेवणावळीवर होणार असलेला खर्च गोरगरिबांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या नवदाम्पत्याने परभणी शहरातील महानगरपालिकेच्या बेघर निवारा येथे जाऊन मास्कचे वाटप केले. तसेच शहरातील 11 गरजू कुटुंबांना धान्याची कीट देऊन आपला गृहप्रवेश केला.

Last Updated : May 7, 2020, 12:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.