ETV Bharat / state

पेरणी ते फवारणी पर्यंतची कामे होणार एकाच यंत्रावर ; परभणीच्या 'वनामकृवि' ने विकसित केले यंत्र - new technology

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले 'फोर इन वन' यंत्र शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. मनुष्यबळ आणि आर्थिक बचत करणारे हे यंत्र कृषी विद्यापीठाच्या संशोधन अभियंता स्मिता सोळंकी यांनी विकसित केले आहे.

पेरणी ते फवारणी पर्यंतची कामे होणार एकाच यंत्रावर
author img

By

Published : Aug 8, 2019, 5:33 AM IST

परभणी - पेरणी ते फवारणी दरम्यान शेतकऱ्यांना प्रचंड परिश्रम करावे लागते. मात्र जिल्ह्याच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने 'फोर इन वन' असे यंत्र विकसित केले आहे ज्याच्या माध्यमातून पेरणी, रासणी, तननाशक आणि किटकनाशक फवारणी असे चारही कामे करता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मनुष्यबळ वाचणार असून आर्थिक बचतही होणार आहे.

पेरणी ते फवारणी पर्यंतची कामे होणार एकाच यंत्रावर

सध्याच्या परिस्थितीत निसर्गाचा लहरीपणा, शेतीचा खर्च व उत्पन्नाचा अंदाज नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परंतु वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले 'फोर इन वन' यंत्र शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. मनुष्यबळ आणि आर्थिक बचत करणारे हे यंत्र कृषी विद्यापीठाच्या संशोधन अभियंता स्मिता सोळंकी यांनी विकसित केले आहे. विशेष म्हणजे 12 मजुरांचे काम या एकाच यंत्राच्या सहाय्याने होते. तसेच या यंत्राच्या मदतीने शेतकऱ्याला रासायनिक औषधांच्या फवारणीपासून होणारे प्रादुर्भाव देखील टाळता येतात.

विशेष म्हणजे हे यंत्र ट्रॅक्टरवर तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना बैलांच्या सहाय्याने देखील वापरता येऊ शकते. याबाबत कृषी विद्यापीठाच्‍या संशोधन अभियंता स्मिता सोळंकी यांनी 'ईटीव्ही भारत' ला सांगितले की, हे यंत्र गरीब शेतकऱ्यांना ही परवडेल. कारण त्याला कुठलेही इंधन लागत नाही. त्याचबरोबर यंत्र चालविण्यासाठी त्यावर सौर पॅनल बसविण्यात आला आहे. या सौर पॅनलचा उपयोग शेतकरी घरगुती विद्युत उपकरणे चालविण्यासाठी देखील करू शकतात. त्यामुळे हे यंत्र सध्या आठ बचत गटांना प्रायोगिक तत्वावर देण्यात आले आहे. शासनाच्या मंजुरीनंतर ते सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे वरदान ठरेल, असेच म्हणावे लागेल.

Intro:परभणी - पेरणी ते फवारणी या दरम्यान शेतकऱ्यांना प्रचंड मशकत करावी लागते. मात्र आता शेतकऱ्यांची ही मशकत कमी करण्यासाठी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने फोरइनवन असे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राच्या माध्यमातून पेरणी, रासणी, तननाशक आणि कीटकनाशक फवारणी असे चार कामे करता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मनुष्यबळ वाचणार असून आर्थिक बचतही होणार आहे.Body:सध्याच्या परिस्थितीत निसर्गाचा लहरीपणामुळे व शेतीसाठी भरमसाठ खर्च केल्यानंतर नेमके उत्पन्न किती हाती लागेल, याची शाश्वती नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे ; परंतु अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणारे हे यंत्र फायदेशीर ठरणार आहे. मनुष्यबळ आणि आर्थिक बचत करणारे हे यंत्र परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधन अभियंता स्मिता सोळंकी यांनी विकसित केले आहे. विशेष म्हणजे 12 मजुरांच्या माध्यमातून होणारे काम या एकाच यंत्राच्या साह्याने होते. आणि शेतकऱ्याला रासायनिक औषधांच्या फवारणी पासून होणारेे प्रादुर्भाव देखील टाळता येऊ शकतात. विशेष म्हणजे हे यंत्र ट्रॅक्टरवर तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना बैलाच्या साह्याने देखील वापरता येऊ शकते. याबाबत कृषी विद्यापीठाच्‍या संशोधन अभियंता स्मिता सोळंकी यांनी 'ई टीव्ही भारत' ला माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, 'हे यंत्र गरीब शेतकऱ्यांना ही परवडते. कारण त्याला कुठलेही इंधन लागत नाही, हे यंत्र चालविण्यासाठी त्यावर सौर पॅनल बसविण्यात आले आहे. त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेवर ते चालते. आणि या सौर पॅनलचा उपयोग शेतकरी घरगुती विद्युत उपकरणे चालविण्यासाठी देखील करू शकतो. त्यामुळे अत्यंत उपयोगी हे यंत्र सध्या आठ बचत गटांना प्रायोगिक तत्वावर देण्यात आले आहे. शासनाच्या मंजुरीनंतर ते सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे वरदान ठरेल, असेच म्हणावे लागेल.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- vis-vo-byte-pkg-story
(pbn_agri_story_vis_byte_pkg)
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.