परभणी - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गुरुवारी 89 जणांनी कोरोनावर मात केली. गेल्या 24 तासांत 29 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला. यात 62 वर्षीय पुरुष, 44 वर्षीय महिला आणि 32 वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 604 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यातील एकूण 358 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या गंगाखेड शहरातून गेल्या 24 तासांत 83 जणांना डिस्चार्ज मिळाला. तर उर्वरित रुग्ण हे पाथरी आणि मानवतमधील आहेत. तसेच तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात परभणी शहरातील हडको भागातील 62 वर्षीय नागरिक, कालाबावर परिसरातील 44 वर्षीय महिला आणि गंगाखेड शहरातील जैदिपूरा भागातील 32 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 29 बाधितांचा 29 मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 29 कोरोनाबाधित नव्याने आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण गंगाखेड शहरात आढळून आले आहेत. गंगाखेड शहरासह तालुक्यात 14 रूग्ण नव्याने आढळले आहेत. नव्याने आढळलेल्या बधितांमध्ये परभणी शहरातील कुरबान अली शहा नगरातील 63 वर्षीय पुरुष, गुलशना बाग परिसरातील 40 वर्षीय पुरुष, त्रिमुर्ती नगरातील 56 वर्षीय महिला, नवा मोंढा परिसरातील 75 वर्षीय पुरुष, कालाबावर परिसरातील 49 वर्षीय महिला, दत्तनगरातील 72 वर्षीय पुरुष, लोकमान्य नगरातील 30 वर्षीय पुरुष, विष्णु नगरातील 43 वर्षीय महिला, विद्यानगरातील 28 वर्षीय पुरुष, मानवत शहरातील गोदु गल्ली भागातील 48 वर्षीय पुरुष, मानवत तालुक्यातील मानोली येथील 65 वर्षीय पुरुष, गंगाखेड शहरातील पोस्ट ऑफीस जवळील 72 वर्षीय महिला आणि 82 वर्षीय पुरुष, नगरेश्वर गल्लीतील 52 वर्षीय महिला, 26 व 55 वर्षीय पुरुष, भाग्य नगरातील 45 वर्षीय महिला, नवा मोंढ्यातील 39, 50 वर्षीय पुरुष, तालुक्यातील डोंगर पिंपळा येथील 37 वर्षीय पुरुष, खडकपुरा भागातील 53 वर्षीय पुरुष, उपजिल्हा रुग्णालयातील 30 वर्षीय महिला आणि 32 वर्षीय पुरुष, ओम नगरातील 20 वर्षीय पुरुष, पाथरी शहरातील कोमटी गल्लीतील 45 वर्षीय पुरुष, गौतमनगरातील 49 वर्षीय पुरुष तर जालना जिल्ह्यातील मंठा येथील 28 वर्षीय महिला आणि निजामाबाद येथील अहेमद पुरा कॉलनीतील 55 वर्षीय महिला, अशा एकूण 9 महिला आणि 20 पुरुष पॉझिटिव्ह आढळले.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या 604 कोरोना बधितांपैकी शासकीय रुग्णालयात 358 जणांवर उपचार करण्यात आले. ते बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 217 रुग्ण हे संक्रमित कक्षात उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 4 हजार 562 संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यात संसर्गजन्य कक्षात 294 तर विलगीकरण केलेले 739 जण आहेत. तसेच यापूर्वी विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले 3 हजार 529 रुग्ण आहेत.
आतापर्यंत एकूण 4 हजार 935 संशयितांचे स्वॅब घेतले आहेत. त्यातील 4 हजार 117 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तर 604 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. 125 स्वॅब अनिर्णायक आहेत. तसेच 52 स्वॅब तपासणीस अयोग्य ठरले आहेत आणि 42 स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.