ETV Bharat / state

Palam Nagar Panchayat election; माजी आमदार सिताराम घनदाटांच्या नेतृत्वात 'राष्ट्रवादी'ला स्पष्ट बहुमत - ZP member Ganeshrao Rokade

निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सीताराम घनदाट व त्यांचे नातू जिल्हा परिषद सदस्य भरत घनदाट यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पॅनेल उभे केले ( Bharat Ghandats NCP panel ) आहे. तर आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाल गुट्टे मित्र मंडळाने (रासप) आणि भाजपचे जिल्हा परिषद सदस्य गणेशराव रोकडे ( ZP member Ganeshrao Rokade ) यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पॅनेल उभे केले होते. मात्र, घनदाट यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पॅनेलने स्पष्ट बहुमत प्राप्त करीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ केला आहे.

पालम नगरपंचायत निवडणूक
पालम नगरपंचायत निवडणूक
author img

By

Published : Jan 19, 2022, 7:51 PM IST

Updated : Jan 19, 2022, 8:59 PM IST

परभणी - जिल्ह्यातील एकमेव नगरपंचायत असलेल्या पालमच्या निवडणुकीत माजी आमदार सिताराम घनदाट यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलने सर्वाधिक 10 जागा पटकावून बहुमत प्राप्त केले ( Palam Nagarpanchayat Election result ) आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 तर रासप 5 आणि भाजपचा 1 व भाजप पुरस्कृत 1 असे एकूण 17 उमेदवार विजयी झाले आहेत.

पालम नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी सव्वा दहाच्या सुमारास प्रारंभ झाला होता. संपूर्ण मतमोजणीचा, प्रभागनिहाय, उमेदवारनिहाय मतमोजणीचा अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला आहे. नगर पंचायतीअंतर्गत 17 पैकी 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनेलने पटकाविल्या आहेत. त्यापाठोपाठ आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या मित्रमंडळाने (रासप) 5 जागा पटकावल्या ( MLA Ratnakar Gutte in election ) आहेत. भाजपच्या हाती केवळ 1 जागा आली आहे. अन्य एका जागेवर भाजप पुरस्कृत उमेदवाराचा विजय झाला आहे.

हेही वाचा-NCP Shivsena Allience in Goa Election : गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती; उत्पल पर्रिकरांबाबत संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

तीन पक्षांच्या पॅनेलमध्ये झाली टक्कर -
निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सीताराम घनदाट व त्यांचे नातू जिल्हा परिषद सदस्य भरत घनदाट यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पॅनेल उभे केले ( Bharat Ghandats NCP panel ) आहे. तर आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाल गुट्टे मित्र मंडळाने (रासप) आणि भाजपचे जिल्हा परिषद सदस्य गणेशराव रोकडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पॅनेल उभे केले होते. मात्र, घनदाट यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पॅनेलने स्पष्ट बहुमत प्राप्त करीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ केला आहे.

हेही वाचा-Goa Assembly election 2022 : काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर; वाचा कुणाला मिळाले तिकीट?

- 82 टक्के झाले होते मतदान -
पालम नगरपंचायत निवडणूकीच्या दोन टप्प्यात 17 जागांसाठी 82 टक्के मतदान झाले होते. दोन्ही टप्प्यातील 17 जागांचे निकाल मात्र एकाच दिवशी म्हणजे आज बुधवारी जाहीर करण्यात आले. सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात 6 टेबलवर मतमोजणी सुरू करण्यात आली होती. 3 फेऱ्यात सकाळी 12 पर्यंत सर्व निकाल हाती आले. यात राष्ट्रवादी 10, राष्ट्रीय समाज पक्ष 5, भाजपा 1 व भाजपा पुरस्कृत 1 अशा जागा उमेदवारांनी जिंकल्या आहेत.

हेही वाचा-चार हात पाय असलेले बाळ जन्मले; डॉक्टर म्हणाले 'अद्भूत, आश्चर्य किंवा देवी करिश्मा...'

विजयी उमेदवारांची नावे - ( Palam Nagarpanchayat election winner candidate list )
प्रभाग क्रमांक एक मधून संजय रामराव थिटे, प्रभाग 2 उबेदूल्ला खान पठाण, प्रभाग 3 खुरेशी मोबीन मेहबूब, प्रभाग 4 अनवरीबी हिदायतुल्ला पठाण, प्रभाग 5 मंगल वसंतराव सिरस्कर, प्रभाग 6 भास्करराव गंगाधरराव सिरस्कर, प्रभाग क्रमांक 7 सविता लक्ष्मणराव रोकडे, प्रभाग 8 सय्यद रजिया बेगम सय्यद इप्तेखार खान, प्रभाग 9 अनिता हत्ती अंबिरे, प्रभाग क्रमांक 10 सरस्वती ज्ञानराज घोरपडे, प्रभाग क्रमांक 11 चाऊस गौसिया आबूदबिन, प्रभाग 12 सरस्वती सदाशिव सिरस्कर, प्रभाग 13 कैलास रामराव रुद्रवार, प्रभाग 14 पठाण हैदरखान अब्दुल्लाखान, प्रभाग 15 पठाण समीरखान अजीउल्ला खान, प्रभाग क्रमांक 16 गजानन आबासाहेब पवार तर प्रभाग क्रमांक 17 मधून ध्रूपदाबाई विश्वनाथ हिवरे हे 17 सदस्य निवडून आले आहेत.

रोकडे यांच्या सुपुत्राचा पराभव -
पालम नगरपंचायत मध्ये सत्तेत असलेल्या गणेशराव रोकडे यांचे 1 सुपुत्र व 1 सून या निवडणूकीत उभे होते. मात्र सुपुत्राला नशिबाने साथ दिली नाही. त्यास विरोधी उमेदवाराच्या समान मते पडल्यानंतर चिठ्ठी काढण्यात आली. मात्र, विरोधकाची चिठ्ठी निघाल्याने ते पराभूत झाले. परंतु विद्यमान नगराध्यक्ष पुत्राची पत्नी मात्र विजयी झाली आहे.

यापुढे 'राष्ट्रवादीत'च सर्व निवडणुका लढवणार -
माजी आमदार सीताराम घनदाट ( MLA Sitaram Ghandat on election victory ) हे गेल्या तीस वर्षापासून गंगाखेड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. ते तीन वेळा अपक्ष म्हणून निवडून आले, तर तीन वेळा पराभूत झाले आहेत. मात्र आताही या मतदारसंघात ते सक्रिय आहेत. दरम्यान, या विजयाबद्दल बोलताना त्यांनी आता यापुढे राष्ट्रवादीतच राहून सर्व निवडणुका लढवू व राष्ट्रवादीला मतदारसंघात अमर करू, असा निश्चय व्यक्त केला.

Last Updated : Jan 19, 2022, 8:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.