ETV Bharat / state

परभणीत 'राष्ट्रवादी काँग्रेस' सर्वात मोठा पक्ष; पालकमंत्री नवाब मलिकांचा दावा

परभणी जिल्ह्यात पक्ष बांधणीकरिता आणि पक्ष संघटन मजबूत व्हावे, यासाठी परभणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (रविवारी) पक्ष पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालकमंत्री नवाब मलिक प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. तसेच त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला.

पालकमंत्री नवाब मलिक
पालकमंत्री नवाब मलिक
author img

By

Published : Jan 24, 2021, 7:07 PM IST

परभणी - मराठवाड्यात बीडनंतर सर्वात जास्त राष्ट्रवादी पक्षाच्या ग्रामपंचायती निवडून आणणारा परभणी जिल्हा ठरला आहे. याठिकाणी 566 पैकी 235 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी विजय झाले असून, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका ठाम असून, कोणाचेही आरक्षण न काढता मराठ्यांना आरक्षण देण्यात येईल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

पालकमंत्री नवाब मलिक

परभणी जिल्ह्यात पक्ष बांधणीकरिता आणि पक्ष संघटन मजबूत व्हावे, यासाठी परभणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (रविवारी) पक्ष पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालकमंत्री नवाब मलिक प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. तसेच त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला.

'अन्य प्रवर्गाला धक्का न लावता मराठा आरक्षण - मलिक

मराठा आरक्षणासाठी सरकारने वेगळा प्रवर्ग तयार करून दिला आहे. इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. हा जो कायदा आहे, त्यालाच हे सरकार पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचे आरक्षण टाकण्यात येत असल्याबाबत जर कोणी दिशाभूल करत असेल, तर त्यावर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे राज्याच्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ओबीसी असतील, आदिवासी असतील किंवा इतर कुठल्याही प्रवर्गातील आरक्षण असेल, त्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याचे देखील ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची सही झालेल्या फाइलवर खाडाखोड करून ती चौकशी दाबण्याची जो प्रकार उघडकीस आला आहे, त्यावर बोलताना मलिक म्हणाले की, जर कोणी ध चा मा करण्याचा प्रयत्न केला असेल तर निश्चितपणे कारवाई करू, असे देखील यावेळी मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

'जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी सतत उपलब्ध'-

यावेळी बोलतांना पालकमंत्री नवाब मलिक म्हणाले, मराठवाड्यात बीडनंतर सर्वात जास्त राष्ट्रवादी पक्षाच्या ग्रामपंचायत निवडून आणणारा परभणी हा जिल्हा आहे.याठिकाणी 566 पैकी 235 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी विजय झाले आहेत. जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस ठरला आहे. पर्यायाने पक्षाकडून जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी सतत उपलब्ध असेल. तसेच परभणीमध्ये शासकीय विद्यालयाचा मुद्दा हा लवकरच सकारात्मकतेने मार्गी लावू, असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

यांनीही केले मार्गदर्शन -

शहरातील वसमत रोडवरील राष्ट्रवादी भवनमध्ये पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या या आढावा बैठकीस जिल्ह्यातील अन्य वरिष्ठ नेत्यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी आमदार बाबाजानी दुर्रानी, खासदार फौजिया खान, माजी खासदार सुरेश जाधव, संतोष देशमुख, भावना नखाते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांनी, तर सूत्रसंचालन संदीप माटेगावकर यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन सुमंत वाघ यांनी मानले.

यांची होती उपस्थिती -

या आढावा बैठकीला परभणी जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच माजी आमदार विजय भांबळे, माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, परभणी शहरजिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, जि.प.उपाध्यक्ष अजय चौधरी, परभणी तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, किरण तळेकर, रितेश काळे, सुमंत वाघ, नंदा राठोड, संदीप माटेगावकर, कृष्णा कटारे, दत्ता मायंदळे, दीपक वारकरी आदीसह पदाधिकारीउपस्थित होते.

हेही वाचा- इंदौर पोलिसांच्या महाराष्ट्रात धाडी; आणखी तीन आरोपींना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.