ETV Bharat / state

'नाम' फाऊंडेशनकडून गरजूंना मदतीचा हात, अन्नधान्याच्या ६०० किटचे वाटप

author img

By

Published : Apr 28, 2020, 11:44 AM IST

Updated : Apr 28, 2020, 12:23 PM IST

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची सामाजिक संघटना असलेल्या नाम फाऊंडेशनने 600 अन्नधान्याचे कीट उपलब्ध करुन दिले आहेत. किरण सोनटक्के यांनी त्यांचे प्रतिष्ठान आणि सावित्रीबाई फुले महिला मंचाच्या माध्यमातून याचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. सोशल डिस्टन्सचा नियम पाळून प्रत्येक कॉलनी, नगर आणि वस्त्यांमध्ये किटचे वाटप करण्यात येत आहे.

'नाम' फाऊंडेशनच्या ६०० किटचे परभणीत 'ज्ञानसाधना'च्या माध्यमातून वाटप

परभणी - नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची सामाजिक संघटना असलेल्या नाम फाऊंडेशनने 600 अन्नधान्याचे कीट उपलब्ध करुन दिले आहेत. या किटचे परभणीत ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाटप केले जात आहे. ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण सोनटक्के यांनी परभणीसह सोनपेठ आणि मानवत या 3 तालुक्‍यात याचे वाटप केले आहे.

वाटपादरम्यान तब्बल १ हजार ४०० आणखी गरजू लोकांची नावे पुढे आली आहेत. त्यामुळे, अन्य काही सेवाभावी संस्था तथा लोकांनी यासाठी पुढे येण्याचे आवाहन सोनटक्के यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला गेला आहे. यामुळे, जवळपास दीड महिन्यापासून गोरगरिबांचा रोजगार थांबला आहे. हाताला काम नसल्याने पैसे मिळत नाही आणि पैसे नाहीत म्हणून घरात चूल पेटत नाही. त्यामुळे, गरजू कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

'नाम' फाऊंडेशनकडून गरजूंना मदतीचा हात

या विदारक परिस्थितीत अनेक सेवाभावी संस्था अन्नधान्याच्या वाटपासाठी पुढे येत आहेत. परभणीत नाम फाउंडेशनच्यावतीने ६०० अन्नधान्याच्या कीट पाठविण्यात आल्या आहेत. किरण सोनटक्के यांनी त्यांचे प्रतिष्ठान आणि सावित्रीबाई फुले महिला मंचाच्या माध्यमातून याचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. सोशल डिस्टन्सचा नियम पाळून प्रत्येक कॉलनी, नगर आणि वस्त्यांमध्ये किटचे वाटप करण्यात येत आहे. गरजू लोकांच्या घरापर्यंत हे सामान पोहोचविण्याचे काम होत असून यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केल्याचे प्रा. सोनटक्के यांनी सांगितले.

Last Updated : Apr 28, 2020, 12:23 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.