ETV Bharat / state

'पालकांकडे फी मागायची नसेल तर, खासगी शिक्षकांचे पगार शासनाने करावेत' - lockdown effect parbhnai news

लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. नागरिक अडचणीत आहेत, अशावेळी महाआघाडी शासनाच्या राज्यमंत्र्यांनी खासगी शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी फी भरू नये, असे सांगितले आहे. मात्र, खासदार फौजिया खान यांनी याबाबत विरोधी भूमिका घेतली आहे. त्यांनी खासगी शाळांच्या पालकांनी फी भरावी अन्यथा खासगी संस्था कशा चालतील, असा सवाल उपस्थित केला आहे.

खासदार फौजिया खान
खासदार फौजिया खान
author img

By

Published : Sep 9, 2020, 5:41 PM IST

परभणी : राज्यातील संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी खासगी शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी फी भरू नये, अशी घोषणा केली आहे; मात्र, ती घोषणा करण्यापूर्वी 'फी घेतली नाही तर खासगी संस्था बंद पडतील', याचा त्यांनी विचार केला पाहिजे आणि फी घ्यायची नसेल तर, शासनाने खासगी संस्थांच्या शिक्षकांचा पगार दिला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार फौजिया खान यांनी आज (बुधवारी) परभणीत एका पत्रकार परिषदेत केली.

खासदार फौजिया खान यांची प्रतिक्रिया

खासदार फौजिया खान या पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, 'एकीकडे केंद्रीय विद्यालयाच्या म्हणजेच शासनाच्याच शाळांमध्ये फी घेतली जाते. मग त्यांना पालकांचा विचार असेल तर, त्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या फी त्यांनी घेऊ नयेत. शिवाय खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून फी घ्यायच्या नसतील तर, शासनाने ऑनलाइन शिक्षणाची कामे करण्यासाठी त्यांचे शिक्षक द्यावेत, अशीही मागणी खासदार खान यांनी केली.

'परभणी जिल्ह्यातील खासगी शाळेकडून फी भरण्यासाठी अनेक पालकांना फोन येत आहेत. विशेष म्हणजे, अनेकांना फी न भरल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाच्या प्रक्रियेपासून दूर केले जात आहे. या प्रश्नावर फौजिया खान म्हणाल्या, 'मला नाही वाटत की, केवळ फीचाच प्रश्न असेल. अनेक पालकांनी शाळेच्या प्रशासनाला येऊन त्यांची अडचण सांगितलीच नाही. पालक प्रतिसाद देत नसतील तर, कसे होणार आणि फीसाठी तर संस्था तगादा लावणारच. त्याशिवाय संस्था कशा चालतील. पालकांनी शक्य असेल तर, फी भरावी, अन्यथा संस्थेला भेटून आपल्या अडचणी सांगाव्यात, संवाद साधावा. कारण शाळेचा खर्च सुरुच आहे तर, पगारही सुरुच आहे. ते कसे भागवायचे, असा सवालदेखील खासदार फौजिया खान यांनी उपस्थित केला.

'विरोधी भूमिकेमुळे आश्चर्य'

विशेष म्हणजे, खासगी शाळांनी फीसाठी पालकांकडे तगादा लावू नये. कारण लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. नागरिक अडचणीत आहेत, अशी भूमिका घेऊन महाआघाडी शासनाच्या एका राज्यमंत्र्याकडून फी न भरण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, त्याच महाआघाडीचा भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी याबाबत विरोधी भूमिका घेतली आहे. त्यांनी खासगी शाळांच्या पालकांनी फी भरावी, अन्यथा खासगी संस्था कशा चालतील, असा सवाल उपस्थित केला. तसेच फी घ्यायची नसेल तर शासनाने खासगी शिक्षकांचे पगार करावेत, अशी विरोधी भूमिका मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा - लाच घेताना परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.