ETV Bharat / state

परभणीत पोटनिवडणूक: एमआयएमने उघडले खाते तर प्रभाग ३ 'ड' मध्ये राष्ट्रवादी

परभणी महापालिकेच्या प्रभाग क्र. ११ आणि प्रभाग क्र. ३ ड साठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. यात प्रभाग क्र. ११ मध्ये एआयएमआयएम तर प्रभाग क्र. ३ ड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला.

जल्लोष करताना एमआयएम आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते
author img

By

Published : Jun 26, 2019, 10:51 AM IST

परभणी - गेल्या दहा वर्षात 'एमआयएम'ने परभणी जिल्ह्यात विविध निवडणुका लढवल्या, अगदी विधानसभेत दुसऱ्या स्थानी राहिलेल्या एमआयएमला आतापर्यंत यश कुठेच मिळाले नव्हते. परंतु रविवारी परभणी महापालिकेच्या २ प्रभागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत त्यांनी आपले पहिले खाते उघडले आहे. पालिकेच्या प्रभाग क्र. ११ मधील पोट निवडणुकीचा सोमवारी निकाल जाहीर झाला असून यात एमआयएमच्या अब्दुल फातेमा अब्दुल जावेद यांचा विजय झाला. तर प्रभाग क्र. ३ मध्ये राष्ट्रवादीच्या गौळणबाई रोडे या विजयी झाल्या आहेत.

जल्लोष करताना एमआयएम आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते

येथील महानगरपालिकेच्या २ प्रभागांसाठी रविवारी मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी कल्याण मंडपम निर्वाचन अधिकारी डॉ. सुचित्रा शिंदे, सहायक निर्वाचन अधिकारी तहसिलदार विद्याचरण कडवकर, उपायुक्त गणपत जाधव, सहायक लेखाधिकारी राठोड, भगवान यादव, बाळासाहेब मोहरीर, फुटाणे, रईस खान, मंजूर हासन, करूणा स्वामी, साहेबराव पवार, मो. अन्नान, परमेश्वर पारधे यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली. यात यात प्रभाग क्र. ३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गवळणबाई रोडे तर प्रभाग क्र. ११ मध्ये एमआयएम पक्षाच्या फातेमा अब्दुल जावेद या विजयी झाल्या आहेत.
प्रभाग क्र. ३ 'ड' मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गवळणबाई रामचंद्र रोडे यांना ६ व्या तथा शेवटच्या फेरी अखेर ३ हजार ६८ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार अलिमोद्दीन इमामोद्दिन काजी यांना १ हजार ३४९ आणि तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अपक्ष उमेदवार फिरोजखान कलंदर खान यांना १ हजार २६५ मतदान मिळाली.

या शिवाय प्रभाग क्र. ११' मधून एकूण १० उमेदवार रिंगणात होते. यात एमआयएमच्या विजयी उमेदवार फातेमा अब्दुल जावेद यांना एकूण ३ हजार ७३४ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अॅड. जावेद कादर यांना निम्मिच म्हणजे १ हजार ५९७ मते मिळाली आहेत. याशिवाय अपक्ष शेख मजरूद्दीन शेख मोईनोद्दीन पटेल यांना १४६ व शेख सत्तार शेख हुसेन पिंजारी यांना केवळ ४६ मते मिळाली. नोटाला ३३ मते मिळाली. निकालाच्या घोषणेनंतर विजयी उमेदवारांनी विजयी मिरवणुक काढली.

सोनपेठमध्ये अपक्ष खरात विजयी

दरम्यान, सोनपेठ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ 'ब' मधील पोटनिवडणुकीत अपक्ष तथा राठोड मित्र मंडळ पुरस्कृत उमेदवार लक्ष्मण खरात यांनी ४९५ मतांनी विजय मिळविला. त्यांनी अपक्ष उमेदवार सुशील सोनवणे यांचा ४९५ मतांनी पराभव केला. सोनपेठ नगरपालिका अधिकृतरित्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. येथे भाजपने निर्मला चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. परंतु, वेळेवर पक्षाचा एबी फॉर्म आला नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यात त्यांना फक्त ११७ मते मिळाली.

Intro:परभणी - गेल्या दहा वर्षात 'एमआयएम' ने परभणी जिल्ह्यात विविध निवडणुका लढवल्या, अगदी विधानसभेत दुसऱ्या स्थानी राहिलेल्या एमआयएम ला आतापर्यंत यश कुठेच मिळाले नाही ; परंतु काल रविवारी झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी आपले परभणी जिल्ह्यातील पहिले खाते उघडले आहे. मनपाच्या प्रभाग अकरा मधील पोट निवडणुकीचा सोमवारी निकाल जाहीर झाला असून यात एमआयएमच्या अब्दुल फातेमा अब्दुल जावेद यांचा विजय झाला. तर प्रभाग तीन मध्ये राष्ट्रवादीच्या गौळणबाई रोडे या विजयी झाल्या आहेत.Body:येथील महानगर पालिकेच्या दोन प्रभागांसाठी काल रविवारी मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी आज सोमवारी कल्याण मंडपम निर्वाचन अधिकारी डाॅ. सुचि़त्रा शिंदे, सहायक निर्वाचन अधिकारी तहसिलदार विद्याचरण कडवकर, उपायुक्त गणपत जाधव, सहायक लेखाधिकारी राठोड, भगवान यादव, बाळासाहेब मोहरीर, फुटाणे, रईस खान, मंजूर हासन, करूणा स्वामी, साहेबराव पवार, मो.अन्नान, परमेश्वर पारधे यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली. यात यात प्रभाग क्र. 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गवळणबाई रोडे तर प्रभाग क्र. 11 मध्ये एमआयएम पक्षाच्या अब्दुल फातेमा अब्दुल जावेद या विजयी झाल्या आहेत.
प्रभाग क्र. 3 'ड' मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गवळणबाई रामचंद्र रोडे यांना 6 व्या तथा शेवटच्या फेरी अखेर 3 हजार 68 मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार अलिमोद्दीन इमामोद्दिन काजी यांना 1 हजार 349 आणि तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अपक्ष उमेदवार फिरोजखान कलंदर खान यांना 1 हजार 265 मतदान मिळाली.
या शिवाय प्रभाग क्र. 3 'ड' मध्ये एकूण 10 उमेदवार रिंगणात होते. यात एमआयएम च्या विजयी उमेदवार अब्दुल फातेमा अब्दुल जावेद यांना एकूण 3 हजार 734 मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अॅड. जावेद कादर यांना निम्मिच म्हणजे 1 हजार 597 मते मिळाली आहेत. याशिवाय अपक्ष शेख मजरूद्दीन शेख मोईनोद्दीन पटेल यांना 146 व शेख सत्तार शेख हुसेन पिंजारी यांना केवळ 46 मतेे मिळाली. नोटाला 33 मते मिळाली. निकालाच्या घोषणेनंतर विजयी उमेदवारांनी विजयी मिरवणुक काढली.

"सोनपेठ मध्ये अपक्ष खरात विजयी"

दरम्यान, सोनपेठ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ 'ब' मधील पोटनिवडणुकीत अपक्ष तथा राठोड मित्र मंडळ पुरस्कृत उमेदवार लक्ष्मण खरात यांनी ४९५ मतांनी विजय मिळविला. त्यांनी अपक्ष उमेदवार सुशील सोनवणे यांचा ४९५ मतांनी पराभव केला. सोनपेठ नगरपालिका अधिकृतरित्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. येथे भाजपाने निर्मला चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. परंतु, वेळेवर पक्षाचा एबी फॉर्म आला नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यात त्यांना फक्त ११७ मते मिळाली.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- photo's & jallosh visualsConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.