बुलावयो ZIM vs PAK 2nd ODI : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आज मंगळवार, 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत झिम्बाब्वे संघ 1-0 नं आघाडीवर आहे.
Pakistan's playing XI for the second ODI against Zimbabwe 📝
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 25, 2024
Tayyab Tahir and Abrar Ahmed will make their ODI debut tomorrow 🏏#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/QyhFTVdFUv
पाकिस्तानला विजय अनिवार्य : पहिल्या वनडे सामन्यात झिंबाब्वे संघानं पाकिस्तानला चारीमुंड्या चित करत 80 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे आज मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवणं अनिवार्य आहे, अन्यथा त्यांच्यावर पहिल्यांदाच झिंबाब्वे विरुद्ध पहिल्यांदाच वनडे मालिका हारण्याची नामुष्की येणार आहे. तर दुसरीकडे झिंबाब्वे संघ हा सामना जिंकून पहिल्यांदाच पाकिस्तान विरुद्ध वनडे मालिका जिंकून इतिहास घडवण्याचा प्रयत्न करेल.
पाकिस्ताननं जाहीर केली प्लेइंग 11 : पहिल्या सामन्यात झालेल्या मानहानीकारक प्रभावानंतर पाकिस्तान दुसऱ्या सामन्याच्या 16 तासांआधीच आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं दोन नव्या खेळाडूंना संघात स्थान दिला असून, हे दोन खेळाडू पाकिस्तानच्या वनडे संघात पदार्पण करणार आहेत. यात तय्यब तहीर आणि आगार अहमद यांचा समावेश आहे.
पहिल्या वनडेत काय झालं : पहिल्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेनं DLS पद्धतीनं पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेचा संघ 40.2 षटकांत 205 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघानं 21 षटकांत 6 गडी गमावून 60 धावा केल्या. त्यानंतर पावसानं सामन्यात व्यत्यय आणला आणि झिम्बाब्वेनं 80 धावांनी सामना जिंकला. आता दुसरा वनडे सामना जिंकून झिम्बाब्वे संघ मालिकेवर कब्जा करु इच्छितो. दुसरीकडे, पाकिस्तान संघाला दुसरा वनडे सामना जिंकायचा आहे आणि मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : पाकिस्तान आणि झिम्बाब्वे एकूण 63 वनडे सामने झाले. यात पाकिस्ताननं 54 सामने जिंकत एकहाती वर्चस्व राखलं आहे. तर झिम्बाब्वे संघानं 6 सामने जिंकले आहेत. तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत आणि एका सामना टाय झाला आहे.
पाकिस्तानची प्लेइंग 11 : सईम अयूब, अब्दुल्ला शफीक, कामरान गुलाम, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर/कर्णधार), आगा सलमान, तय्यब तहीर, इरफान खान, आमेर जमाल, हारिस रऊफ, अबरार अहमद, फैसल अकरम
झिम्बाब्वे संघ : क्रेग एर्विन (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, जॉयलॉर्ड गॅम्बी, ट्रेवर ग्वांडू, क्लाइव्ह मदांडे, टिनोटेंडा माफोसा, तदिवनाशे मारुमनी, ब्रँडन मावुता, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुझाराबानी, डिओन मायर्डन, रिकान मायडर्स, डिओन मायडर्स. विल्यम्स.
हे वाचलंत का :
- पाकिस्तानविरुद्ध मालिका जिंकत झिम्बाब्वे इतिहास रचणार की भारताचे शेजारी प्रतिष्ठा राखणार? निर्णायक वनडे 'इथं' पाहा लाईव्ह
- कांगारुंना त्यांच्या घरात पराभूत केल्यानंतर पाकिस्तान झिम्बाब्वेलाही हरवणार? ऐतिहासिक सामना 'इथं' पाहा लाईव्ह
- पाकिस्तानचा अजब निर्णय, एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळणाऱ्याला बनवलं बॅटिंग कोच