ETV Bharat / state

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राजू शेट्टींना कृषिमंत्री करा- रसिका ढगे - parbhani

माजी खासदार राजू शेट्टी यांना राज्य सरकारमध्ये कृषिमंत्री पद मिळायला हवे. तसे झाल्यावरच शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर प्रश्न सुटतील. त्यामुळे नुकतेच सत्तेत आलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीने राजू शेट्टींना कृषिमंत्री करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे यांनी आज परभणीत केली.

parbhani
रसिका ढगे
author img

By

Published : Dec 1, 2019, 5:13 PM IST

परभणी- सत्ताधारी एनडीएला प्रखरपणे विरोध करत शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टी यांना राज्य सरकारमध्ये कृषिमंत्री पद मिळायला हवे. तसे झाल्यावरच शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर प्रश्न सुटतील. त्यामुळे नुकतेच सत्तेत आलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीने राजू शेट्टींना कृषिमंत्री करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे यांनी आज परभणीत केली.

प्रतिक्रिया देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला प्रदेश अध्यक्षा रसिका ढगे

या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (रविवारी) दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली मागणी पत्रकारांसमोर मांडली. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे व पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना रसिका ढगे म्हणाल्या, शेतीच्या प्रश्नी भाजपची दुटप्पी भूमिका असल्याचे लक्षात आल्याने सत्तेचा त्याग करून स्वाभिमानी शेतकरी संघटना 'एनडीए' मधून बाहेर पडली. त्यानंतरच्या काळात देश पातळीवरील वेगवेगळ्या राज्यातील शेतकरी संघटनांची एकसंघ बांधणी करण्यासाठी राजू शेट्टी यांनी देशपातळीवर अनेक दौरे केले.

देशातील २०८ शेतकरी संघटनांची संपूर्ण कर्जमुक्तीसह वेगवेगळ्या प्रश्नी संसदेवर लाखो शेतकरी एकत्र करून मोर्चा काढला. यावेळी देशभरातील शेतकरी संघटनांनी राजू शेट्टी यांचे नेतृत्व मान्य केले. या दरम्यानच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपच्या विरोधात भूमिका घेत काँग्रेस प्रणित आघाडीत सक्रिय सहभाग घेतला. राज्यातील वातावरण भाजपच्या धोरणा विरोधी करण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. राज्यात आघाडी सरकारला भाजपा धोरणात यश संपादन करण्यासाठी राजू शेट्टी यांनी सिंहाचा वाटा उचलला. शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची कारणे, चुकीची आयात-निर्यात धोरणे, कायदे, ऊस, कांदा, दूध, कापूस अश्या वेगवेगळ्या पिकांच्या समस्याची अभ्यासपूर्ण मांडणी केली.

तसेच हे प्रश्न सोडवण्याची धमक केवळ राजू शेट्टी यांच्यातच आहे, असा दावा देखील रसिका ढगे यांनी केला. त्यामुळे या गोष्टीची जाणीव शेतकऱ्यांसह आघाडी सरकारलाही आहे. म्हणून महिला आघाडी आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसह पदधिकाऱ्यांच्या वतीने राजू शेट्टी यांना राज्यातील मंत्री मंडळात कॅबिनेट कृषिमंत्री पदी वर्णी लावावी, अशी अग्रही मागणी महाविकास आघाडीकडे केली असल्याचे रसिका ढगे म्हणाल्या. यावेळी रसिका ढगे यांच्यासह जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटिंग, केशव अरमल, मुंजाभाऊ लोंढे, हनुमान मसलकर, शेख जाफर तरोडेकर, अजमत पटेल आणि माऊली लोंढे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा- जिल्हा हिवताप कार्यालयातील संघर्ष समितीचे निदर्शन; परिपत्रकाची केली होळी

Intro:परभणी - सत्ताधारी एनडीएला प्रखरपणे विरोध करत शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टी यांना राज्य सरकारमध्ये कृषिमंत्री पद मिळायला हवे. तसे झाल्यासच शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर प्रश्न सुटतील. त्यामुळे नुकतेच सत्तेत आलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीने राजू शेट्टींना कृषिमंत्री करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे यांनी आज परभणीत केली.Body: या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (रविवारी) दुपारी पत्रकार परिषद घेऊन या बाबत आपली मागणी पत्रकारांसमोर मांडली. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे व पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना रसिका ढगे म्हणाल्या, शेती प्रश्नी भाजपची दुट्टपी भूमिका असल्याचे लक्षात आल्याने सत्तेचा त्याग करून स्वाभिमानी शेतकरी संघटना 'एनडीए' मधून बाहेर पडली. त्यानंतरच्या काळात देश पातळीवरील वेगवेगळ्या राज्यातील शेतकरी संघटनांची एकसंघ बांधणी करण्यासाठी राजु शेट्टी यांनी देशपातळीवर अनेक दौरे केले. देशातील २०८ शेतकरी संघटनांचा संपूर्ण कर्जमुक्तीसह वेगवेगळ्या प्रश्नी संसदेवर लाखो शेतकरी एकत्र करून मोर्चा काढला. या वेळी देशभरातील शेतकरी संघटनांनी राजु शेट्टी यांचे नेतृत्व मान्य केले. या दरम्यानच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपच्या विरोधात भूमिका घेत काँग्रेस प्रणित आघाडीत सक्रिय सहभाग घेतला. राज्यातील वातावरण भाजपच्या धोरणा विरोधी करण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. राज्यात आघाडी सरकारला भाजपा धोरणात यश संपादन करण्यासाठी राजु शेट्टी यांनी सिहाचा वाटा उचलला. शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची कारणे, चुकीची आयात-निर्यात धोरणे, कायदे, ऊस, कांदा, दूध, कापूस अश्या वेगवेगळ्या पिकांच्या समस्याची अभ्यासपूर्ण मांडणी केली. तसेच हे प्रश्न सोडवण्याची धमक केवळ राजु शेट्टी यांच्यातच आहे, असा दावा देखील यावेळी ढगे यांनी केला. त्यामुळे या गोष्टीची जाणीव शेतकऱ्यांसह आघाडी सरकारलाही आहे. म्हणून महिला आघाडी आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसह पदधिकाऱ्यांच्या वतीने राजु शेट्टी यांना राज्यातील मंत्री मंडळात कॅबिनेट कृषीमंत्री पदी वर्णी लावावी, अशी अग्रही मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी रसिका ढगे यांच्यासह जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटिंग, केशव अरमल, मुंजाभाऊ लोंढे, हनुमान मसलकर, शेख जाफर तरोडेकर, अजमत पटेल आणि माऊली लोंढे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत - pbn_rasika_dhage_press_vis_byteConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.