परभणी - जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल (रविवार) रात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाची भुरभुर सुरू असून, या पावसाचा परिणाम आज होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर होण्याची शक्यता आहे. या पावसात मतदार नेमका किती प्रतिसाद देतात, हे सायंकाळी करणार आहे.
परभणी जिल्ह्यातील परभणी पाथरी गंगाखेड आणि जिंतूर या मतदारसंघांसाठी मतदानाची प्रक्रिया आज पार पाडत आहे. जिल्ह्यात एकूण 14 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, यासाठी जवळपास 600 हून अधिक मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. प्रशासन सज्ज असून दिवसभर प्रत्येक मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच मतदारांना आकर्षीत करण्यासठी आदर्श आणि सखी मतदान केंद्रांची देखील निर्मिती करण्यात आली आहे.