ETV Bharat / state

परभणी : संचारबंदीत 'या' सेवांना मिळणार सूट

author img

By

Published : Mar 24, 2021, 2:47 PM IST

गेल्या 20 दिवसांपासून परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. कोरोनाची ही साखळी तुटावी, म्हणून उपाययोजनांचा एक भाग म्हणून आज (बुधवारी) सायंकाळी सात वाजल्यापासून ते 1 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आदेशात म्हटले आहे. या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे.

Breaking News

परभणी - जिल्ह्यात वाढणारा कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज (बुधवारी) संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते 1 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. या संदर्भात त्यांनी आज (बुधवारी) दुपारी नव्याने आदेश बजावले असून, त्यात नियमांचा भंग केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. या दरम्यान अनेक सेवांना सूट देण्यात आली असून, यामध्ये अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय व माध्यम प्रतिनिधी, औषधी दुकाने, लसीकरण केंद्र, शासकीय वाहने आणि वर्तमानपत्रांच्या वितरकांसह अन्य काही सेवांना सूट देण्यात आली आहे.

'या' अत्यावश्यक सेवांना असणार आहे सूट
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील नागरी क्षेत्रात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीतून काही व्यक्ती व समूहाला सूट राहणार आहे. त्यात सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, त्यांचे अधिकारी, कर्मचारी, त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने, रुग्णवाहिका, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने, वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी लसीकरण केंद्र, rt-pcr चाचणी व तपासणी केंद्र, वैद्यकीय आपत्काल व त्यासंबंधी सेवा रुग्णांना घेऊन येणारी वाहने, त्यांचे नातेवाईक, त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने व व्यक्ती, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वितरक आदींचा समावेश आहे.

हेही वाचा- मुंबई पोलीस दलात मोठी उलथापालथ; तब्बल ८६ अधिकाऱ्यांच्या एकाच दिवशी बदल्या

घरपोच किराणा, आयकर संबंधित व्यक्तींनाही सूट
सदर संचारबंदीत वरीलप्रमाणे पेट्रोल पंप व गॅस वितरक कर्मचारी व त्यांची वाहने, किराणा दुकानातून होणारी घरपोच सेवा, दूध विक्रेते (गल्ली, कॉलनी, सोसायट्यामध्ये घरोघरी जाऊन सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत या कालावधीत विक्री करावी, एका ठिकाणी थांबून विक्री करता येणार नाही) कोरोना लसीकरण केलेल्या व्यक्ती व लसीकरणासाठी जाणाऱ्या तसेच आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तींना सुट राहील. तसेच स्पर्धा परीक्षेसाठीच्या अभ्यासिका, वाचनालयातील विद्यार्थी व कर्मचारी वर्ग इत्यादी. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांचे अंतर्गत कामकाज, शासकीय चालान, शासकीय रोकड, घेऊन जाणारी वाहने, अत्यावश्यक सेवेतील बँक व्यवहार यांना संचारबंदी कालावधीत सूट देण्यात आली आहे. या प्रमाणेच सीए, सी एम ए, सी एस, टॅक्स प्रॅक्टिसनर्स इत्यादी सेवांची कार्यालये व त्यांची वाहने, स्वस्त धान्य दुकाने (शक्यतो घरपोच धान्य देण्याचा प्रयत्न करावा).

परिक्षार्थ्यांना देखील सूट
दरम्यान, उद्या 25 व परवा 26 मार्च रोजी श्री शिवाजी महाविद्यालय येथे घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन परीक्षेसाठी येणारे अधिकारी-कर्मचारी, प्राध्यापक यांना देखील सूट असणार आहे. तसेच घरपोच पाणी पुरवठा करणारी वाहने, लसीकरणासाठी नियुक्त केलेले अधिकारी-कर्मचारी, बीएलओ यांना या संचारबंदीच्या काळात सूट देण्यात आली आहे. मात्र, या व्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्ती संचारबंदीच्या काळात रस्त्याने बाजारामध्ये, गल्लीमध्ये, घरा बाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार पात्र असलेला अपराध केला आहे, असे समजण्यात येईल. त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिला आहे.

हेही वाचा- 'महाराष्ट्रात उघड्यांना नागडे म्हणायचे व गुजरात, उत्तर प्रदेशमधील नागड्यांकडे डोळेझाक करायची'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.