ETV Bharat / state

परभणी मतदारसंघात संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष बंदोबस्त; स्ट्राँग रुमला देखील कडक सुरक्षा

उद्या (गुरुवारी) परभणी लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.  परभणी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी विधानसभा क्षेत्रात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा क्षेत्रात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
author img

By

Published : Apr 17, 2019, 11:57 AM IST

परभणी - लोकसभा मतदारसंघात एकूण ६४ मतदान केंद्रे संवेदनशील असून त्यापैकी परभणी जिल्ह्यात येणाऱ्या ५१ संवेदनशील केंद्रांवर पोलिसांचा विशेष बंदोबस्त राहणार आहे. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांसोबतच या भागात विशेष पथक गस्त घालणार आहे. या प्रमाणेच ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणाऱ्या कृषी विद्यापीठातील स्ट्राँग रुमला देखील एसआरपी आणि सीआरपीएफ जवानांचे कडक सुरक्षा कवच राहणार असल्याची माहिती पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा क्षेत्रात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

उद्या (गुरुवारी) परभणी लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी विधानसभा क्षेत्रात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सर्व मतदान केंद्रांवर पोलिसांसोबत राखीव दल आणि होमगार्ड यांचा बंदोबस्त असेल. शिवाय जिल्ह्यातील ५१ संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा बल तैनात करण्यात येणार असून या केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक दिवसभर गस्त घालणार आहे. दरम्यान, परभणी पोलीस दलाच्यावतीने परभणी शहरासह सर्व तालुक्यांच्या ठिकाणी पथसंचलन करून सुरक्षेची खात्री सामान्य नागरिकांना दिली आहे.

असे असेल सुरक्षा बल

परभणी जिल्ह्यात पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यासह अकरा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सुरक्षा बल तैनात असणार आहे. यामध्ये १७ पोलीस निरीक्षक, १०४ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १८८० पोलीस कर्मचारी, ७८४ होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या दोन कंपनी, सीआरपीएफ तीन कंपनी बंदोबस्तासाठी असणार आहेत. याशिवाय मतदान पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणाऱ्या कृषी विद्यापीठातील स्ट्राँग रूमला देखील तगडा बंदोबस्त असेल. याठिकाणी सीआरपीएफ आणि एसआरपीच्या प्रत्येकी एक कंपनी, ७५ पोलीस कर्मचारी, ९ एपीआय, ३ पीआय नियुक्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली आहे.

परभणी लोकसभा क्षेत्रात एकूण ६४ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यापैकी परभणी जिल्ह्यात ५१ केंद्र असून उर्वरित सेवा केंद्र जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतूर विधानसभेत येतात.

Intro:परभणी - परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण 64 मतदान केंद्र संवेदनशील असून त्यापैकी परभणी जिल्ह्यातील येणाऱ्या 51 संवेदनशील केंद्रांवर पोलिसांचा विशेष बंदोबस्त राहणार आहे. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांसोबतच या भागात विशेष पथक गस्त घालणार आहे. या प्रमाणेच ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणाऱ्या कृषी विद्यापीठातील स्ट्राँग रूम ला देखील एसआरपी आणि सीआरपीएफ जवाणांचे कडक सुरक्षा कवच राहणार असल्याची माहिती पोलिस दलाच्या वतीने देण्यात आली आहे.Body: उद्या (गुरुवारी) परभणी लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. कारण कुठल्याही निवडणूक काळात व्यवस्थापन इतकेच सुरक्षेचे महत्त्व असते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची सुरक्षा गरजेचे आहे. त्यानुसार परभणी लोकसभा मतदारसंघ येणाऱ्या जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी विधानसभा क्षेत्रात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सर्व मतदान केंद्रांवर पोलिसांसोबत राखीव दल आणि होमगार्ड यांचा बंदोबस्त असेल. शिवाय जिल्ह्यातील 51 संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा बल तैनात करण्यात येणार आहेत. विशेषतः जिल्ह्यातील 51 संवेदनशील मतदान केंद्राच्या सभोवताल लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक दिवसभर गस्त घालणार आहे. दरम्यान, परभणी पोलीस दलाच्या वतीने परभणी शहरासह सर्व तालुक्यांच्या ठिकाणी पथसंचलन करून सुरक्षेची खात्री सामान्य नागरिकांना दिली आहे.

"असे असेल सुरक्षा बल"

दरम्यान, परभणी जिल्ह्यात पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्यासह अकरा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सुरक्षा बल तैनात असणार आहे. यामध्ये 17 पोलीस निरीक्षक, 104 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 1880 पोलीस कर्मचारी, 784 होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या दोन कंपनी, सीआरपीएफ तीन कंपनी बंदोबस्तासाठी असणार आहेत. याशिवाय मतदान पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणाऱ्या कृषी विद्यापीठातील स्ट्रॉंग रूमला देखील तगडा बंदोबस्त असेल. याठिकाणी सीआरपीएफ आणि एसआरपीच्या प्रत्येकी एक कंपनी, 75 पोलीस कर्मचारी, 9 एपीआय, 3 पीआय आणि एनियुक्ती करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली आहे.

"हे आहेत संवेदनशील मतदान केंद्र"

परभणी लोकसभा क्षेत्रात एकूण 64 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यापैकी परभणी जिल्ह्यात 51 केंद्र असून उर्वरित सेवा केंद्र जालना जिल्ह्यातील घनसावंगी यांनी परतुर विधानसभेत येतात. यामध्ये जिंतूर विधानसभा मतदार संघात जिल्हा परिषद प्रशाला सावंगी भांबळे, जिल्हा परिषद प्रशाला चारठाणा, जि.प. उर्दू कन्या शाळा मेवाती मोहल्ला जिंतूर, जि.प.प्रा.शा. चिकलठाणा, जिल्हा परिषद कन्या प्रशाला वालूर, जि.प. हायस्कूल बोरी, जि.प. प्रा.शा. आसेगाव, जि.प. प्रा.शा. दुधगाव, जि. प.प्रशाला कौसडी, जि.प.प्रा.शा. न्यू राजमोहल्ला, डॉ. झाकीर हुसेन, प्रा.शाळा, राजमोहल्ला सेलू, मन्युसिपल कौन्सिल, शादीखाना सेलू, शासकीय मुलींचे वसतीगृह सेलू, न्यू हायस्कूल सेलू, गोमतीबाई बालवाडी सेलू, जि.प.प्रा.शा. ढेंगळी पिंपळगाव, परभणी विधानसभा मतदारसंघात जि.प.प्रा.शा. मांडवा, जि.प.हायस्कूल झरी, जि.प.प्रा.शा. सावंगी खु., जि.प.प्रा.शा. टाकळी कुंभकर्ण, डॉ.झाकेर हुसेन माध्यमिक महाविद्यालय, श्रीरामजी मुंदडा मराठवाडा पॉलिटेक्निक, जि.प.पूर्व माध्यमिक शाळा, शनिवार बाजार, नगर परिषद प्राथमिक शाळा मोमीनपुरा, वसंतराव नाईक हायस्कूल कारेगावरोड, इंदिरा गांधी गर्ल्स उर्दू हायस्कूल शाही मशिदजवळ, कामगार कल्याण केंद्र काद्राबाद प्लॉट, भैय्यासाहेब आंबेडकर हॉल गौतमनगर, आंबेडकर वाचनालय राहुलनगर, पशुधन विकास अधिकारी कुकुटपालन प्रकल्प गंगाखेड रोड, महात्मा फुले विद्यालय, भीमनगर, मॉडेल उर्दू हायस्कूल गालीबनगर, जि.प.प्रा.शा. असोला, जि.प.प्रा.शा. बाभळी, जि.प.कन्या शाळा पिंगळी, गंगाखेड मतदारसंघात जि.प.कन्या शाळा ताडकळस, जि.प.प्रा.शा. दुसलगाव, जि.प.प्रा.शा. महातपुरी, जि.प.प्रा.शा. मरगळवाडी, जि.प.प्रा.शा. पूर्णा, जि.प.प्रा.शा. आंबेडकरनगर पूर्णा, जि.प.प्रा.शा. धनगरटाकळी, जि.प.प्रा.शा. उखळी खु., जि.प.प्रा.शा. चुडावा, जि.प.प्रा.शा. धारासूर. पाथरी मतदारसंघात जि.प. प्रा.शाळा. देवनांद्रा साखर कारखाना, वसाहत, जि.प.प्रा.शा. भोसा, जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा पेडगाव, जि.प.प्रा.शाळा, शेळगाव, जि.प.प्रा. शा. धामोनी, परतूर मतदारसंघात जि.प.प्रा.शा. तळणी दक्षिण बाजू, जि.प.प्रा.शा. तळणी उत्तर बाजू, जि.प.प्रा.शा. अंबोडा, जि.प.प्रा.शा. केंधळी, जि.प.प्रा.शा. पिंपळवाडी, जि.प.प्रा.शा. सोनदेव, जि.प.प्रा.शा. केंधळी. घनसावंगी मतदारसंघात चिटली पुटली, महाकळा (3), तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव या मतदान केंद्रांचा समावेश आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- पोलीस पथसंचलनाचे विजवल.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.