ETV Bharat / state

परभणीत शनिवारी 804 नवे बाधित तर 22 रुग्णांचा मृत्यू - परभणी कोरोना रुग्ण

आज (शनिवार) जिल्ह्यात तब्बल 804 नवीन कोरोनाबाधित आढळले असून, 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे 532 व्यक्तीं कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, सध्य जिल्ह्यात एकूण 7 हजार 144 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

परभणी
परभणी
author img

By

Published : Apr 24, 2021, 10:28 PM IST

परभणी - दिवसेंदिवस पसरत जाणाऱ्या कोरोना संसर्गामुळे नव्या बधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज (शनिवार) जिल्ह्यात तब्बल 804 नवीन कोरोनाबाधित आढळले असून, 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे 532 व्यक्तीं कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, सध्य जिल्ह्यात एकूण 7 हजार 144 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

आतापर्यंत 776 बधितांची मृत्यू -

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असून शनिवारी 804 नवीन बाधित आढळले तर 22 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात 7 हजार 144 बाधित उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत 776 करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत 30 हजार 777 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 22 हजार 857 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 25 हजार 868 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 95 हजार 166 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, तर 30 हजार 777 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 876 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले.

आजही आयटीआय इमारतीत सर्वाधिक मृत्यू -

दरम्यान गेल्या 24 तासात 22 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. यात 17 पुरुष तर 5 महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय इमारतीमधील कोरोना हॉस्पिटलमध्ये काल शुक्रवार प्रमाणे आजही सर्वात जास्त रुग्णाचा मृत्यू झाला. तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असून, याशिवाय जिल्हा रुग्णालयात 1, जिल्हा परिषद कोरोना हॉस्पिटल 4 आणि इतर रुग्णांचा मृत्यू जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये झाला आहेत.

परभणी जिल्ह्यात 332 बेड शिल्लक -

दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना हॉस्पिटल्ससह खाजगी मंगल कार्यालय आणि इतर इमारतीमधून 30 कोरोना हॉस्पिटल सुरू आहेत. ज्यामध्ये 7 हजार 144 रुग्ण उपचार घेत आहेत. या सर्व 30 रुग्णालयांमध्ये 6 हजार 901 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी सध्य केवळ 332 बेड रिकामे आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक बेड रेणुका हॉस्पिटल येथे 141 बेड रिकामे असून, त्याखालोखाल जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय हॉस्पिटल मध्ये 48 बेड शिल्लक आहेत. याशिवाय जिल्हा रुग्णालयात 1, जिल्हा परिषद कोरोना हॉस्पिटल 12, भारत हॉस्पिटल 6, डॉ. प्रफुल पाटील हॉस्पिटल 25, अक्षदा मंगल कार्यालय 25, सूर्या हॉस्पिटल 7, सामाले हॉस्पिटल 10, सिद्धिविनायक हॉस्पिटल 5, ह्यात हॉस्पिटल 3, सुरवसे मॅटर्निटी 5, देहरक्षा हॉस्पिटल 20, स्पर्श हॉस्पिटल 14 तर गोकुळ हॉस्पिटलमध्ये 10 बेड शिल्लक आहेत. त्यामुळे नव्याने बाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांनी बेड शिल्लक नसल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता या रुग्णालयांमध्ये संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच 5 हजार 639 रुग्ण घरून (होम आयसोलेशन) उपचार घेत आहेत.

2086 संशयितांची तपासणी -

दरम्यान, गेल्या 24 तासात जिल्ह्यात 2 हजार 86 संशयितांची 'आरटीपीसीआर' चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये मनपाच्या विविध केंद्रांवर 872 तर जिल्हा रुग्णालयात 226, गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात 115, पालम ग्रामीण रुग्णालयात 40, पूर्णा 101, सोनपेठ 38, पाथरी 206, सेलू 169 तर जिंतूर रुग्णालयांतर्गत 316 संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.