ETV Bharat / state

हप्तेखोरी, वसुली भोवली; परभणीतील 3 पोलीस कर्मचारी निलंबित - 3 police personnel suspended Parbhani

एका असाह्य महिलेचा गैरफायदा घेणे, अवैध व्यावसायिकांकडून पैसे वसूल करणे, तसेच वाळू माफियांकडून माहिनेवारी हप्ता घेण्याचा प्रकार परभणी पोलीस दलातील 3 कर्मचाऱ्यांना चांगलाच अंगलट आला आहे.

Police Parbhani
परभणी पोलीस
author img

By

Published : Jan 31, 2021, 10:05 PM IST

परभणी - एका असाह्य महिलेचा गैरफायदा घेणे, अवैध व्यावसायिकांकडून पैसे वसूल करणे, तसेच वाळू माफियांकडून माहिनेवारी हप्ता घेण्याचा प्रकार परभणी पोलीस दलातील 3 कर्मचाऱ्यांना चांगलाच अंगलट आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी तिन्ही पोलिसांना निलंबित केल्याचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे, पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - 'जीएसटी'तील किचकट तरतुदी विरोधात परभणीत आंदोलन

महिनेवारी हप्ता घेत असल्याने पूर्णेच्या कर्मचाऱ्यावर कारवाई

पूर्णा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विनोद रत्ने हे अवैध वाळूचा उपसा करणाऱ्यांसह ट्रॅव्हल्सधारकांकडून महिनेवारी पैसे वसूल करत असल्याचे सिद्ध झाले होते. स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला व पदाचा गैरवापर केला असल्याचे त्यांच्या निलंबन आदेशात पोलीस अधीक्षक मीना यांनी म्हटले आहे. तसेच, एक जबाबदार कर्तव्यनिष्ठ पोलीस हवालदार दर्जाचे अंमलदार असतानाही अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालणे अपेक्षित असताना केवळ स्वतःच्या आर्थिक लाभाकरिता अवैधरित्या पैसे घेऊन अवैध धंद्यांना चालना देत असल्याचा कसूर केला असल्याचेसुद्धा रत्ने यांच्या निलंबन आदेशात नोंद करण्यात आले.

मानवतच्या पोलिसाला गुटखा माफियांची वसुली भोवली

मानवत पोलीस ठाण्यातील कर्मचारी रसूल दाऊद शेख याने अवैध दारू विक्रेत्यांसह गुटखा विक्री करणाऱ्यांकडून पैसे वसूल करीत कर्तव्यात कसूर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच, अवैध धंदे चालकांवर अंकुश ठेवण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे वसूल करून बेकायदेशीर कृत्य करून पोलीस दलाची प्रतिमा मलीन केली असल्याचे त्यांच्या निलंबन आदेशात म्हटले आहे.

सेलूच्या पोलिसाला असाह्य महिलेचा गैरफायदा भोवला

सेलू ठाण्यातील कर्मचारी संजय साळवे यांनी एका परित्यक्त्या महिलेशी जवळीक निर्माण करत शारीरिक संबंध ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. साळवे यांनी निराधार पीडित महिलांना संरक्षण देण्याऐवजी त्यांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला. ज्यामुळे साळवे यांना निलंबित केल्याचे त्यांच्या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा - आरोग्य सुविधांसह सरकारी रुग्णालय अद्ययावत करणार - पालकमंत्री नवाब मलिक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.