ETV Bharat / state

परभणी: बाह्य, आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीसह हॉटेल, चहास्टॉल आणि पानटपऱ्या बंद

author img

By

Published : Mar 20, 2021, 6:44 PM IST

जिल्ह्यातील इतर बसस्थानकात प्रवाशांची गर्दी व बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक होत असल्याने कोरोना संसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आंतर जिल्हा व जिल्हाअंतर्गत सर्व सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीस प्रतिबंधित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आदेशात नमुद केले आहे.

Hotels tea stalls and inter-district transport closed in parbhani
परभणी

परभणी - कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टिकोनातून परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज शनिवारी आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत एसटीसह खासगी बससेवा सोमवार अर्थात 22 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत पूर्णतः बंद करण्याचे आदेश बजावले आहेत. याशिवाय जिल्ह्यातील लॉन, हॉटेल, रेस्टॉरंटसह चहास्टॉल आणि पानपटऱ्या देेखील या कालावधीत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, हॉटेलचालकांना पार्सल स्वरूपात खाद्यपदार्थ विक्री व वितरित करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

महामंडळ व खासगी बससेवा 31 मार्चपर्यंत बंद -

परभणी शहरात नवीन बसपोर्टची उभारणी होत आहे. ज्यामुळे जुने बसस्थानक जमीनदोस्त करण्यात आल्याने पुढील बाजूस तात्पुरत्या स्वरूपात पत्राच्या शेड मध्ये बसस्थानक निर्माण करण्यात आले. मात्र, या बसस्थानकाची जागा प्रवाशांसाठी अत्यंत अपुरी आहे. शिवाय जिल्ह्यातील इतर बसस्थानकात प्रवाशांची गर्दी व बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक होत असल्याने कोरोना संसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आंतर जिल्हा व जिल्हाअंतर्गत सर्व सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीस प्रतिबंधित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आदेशात नमुद केले आहे. त्यानुसार एसटी महामंडळाची तसेच खासगी बसमधुन होणारी सर्व प्रवाशी वाहतुक 22 ते 31 मार्चपर्यंत आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत सेवा पूर्णपणे बंद करण्याचे आदेश बजावले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक व उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांच्यावर राहील, असेही या आदेशात नमूद केले आहे.

लॉन, हॉटेल, चहा स्टॉल, पानपट्टी, रेस्टॉरंटला बंद -

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जिल्ह्यातील चहा स्टॉल, पानपट्टी, रेस्टॉरंट, हॉटेल, किचन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. तसेच या ठिकाणी होणार्‍या गर्दीच्या अनुषंगाने सूचना देऊनही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. कोरोनाच्या संसर्गात वाढ होऊ नये म्हणून खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या बाबतीत निर्बंध घालणे आवश्यक असल्याने चहास्टॉल, पानपट्टी, रेस्टॉरंट, हॉटेल, लॉन बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज (शनिवारी) सायंकाळी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त, सर्व नगर पालिका व नगर पंचायत मुख्याधिकारी, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्यावर राहील, असेही या आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा - नागपुरात लॉकडाऊन वाढणार का? पालकमंत्री घेणार आढावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.