ETV Bharat / state

परभणीत पावसाची जोरदार हजेरी; शेतकऱ्यांना दिलासा - पावसाचा जोर कायम

बुधवारी रात्री साडेआठ वाजता पावसाला सुरुवात झाली ते रात्री 11 वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता.

परभणीत पावसाची जोरदार हजेरी
author img

By

Published : Sep 12, 2019, 8:25 AM IST

परभणी - शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी रात्री साडेआठ वाजल्यापासून पावसाने जोरदार बॅटींग सुरू केल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. बुधवारी रात्री साडेआठ वाजता पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्री 11 वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता.

परभणीत पावसाची जोरदार हजेरी

हेही वाचा - परभणीत गणपती विसर्जनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; अडीच हजाराचा फौजफाटा तैनात

परभणी जिल्ह्यात सरासरी 774.62 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, गेल्या काही वर्षात सुमारे 70-75 टक्के पाऊस पडत असल्याने पावसाचा मोठा खंड पडत आहे. त्यामुळे सातत्याने दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत. यावर्षी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 3 महिन्यात परभणी जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या केवळ 68.87 टक्के पाऊस पडला आहे. आजपर्यंत प्रत्यक्षात 607.24 मिलिमीटर पाऊस पडायला हवा होता. परंतु, 417 मिलिमीटरच पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अपेक्षित पावसाच्या 30 टक्क्यापेक्षा कमी पाऊस पडला आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ 62 टक्के आहे.

हेही वाचा - वडिलांना भाजपच्या दारात मुजरा करायला लावणारे वंशाचे दिवे काय कामाचे, सुप्रिया सुळेंची टीका

त्यामुळे येणाऱ्या केवळ 18 दिवसांमध्ये 40 टक्के पाऊस पडणे अपेक्षित आहे. तर जिल्ह्यातील मासोळी, येलदरी, निम्न, दुधना, करपरा, दिग्रस, मुळी या मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये 10 ते 20 टक्के साठा पाणीसाठा शिल्लक आहे. तर 22 लहान-मोठ्या प्रकल्प अजूनही मृत साठ्यातच आहेत. त्यामुळे हे प्रकल्प भरण्यासाठी येणाऱ्या 40 दिवसात दमदार पाऊस होण्याची अपेक्षा आहे.

Intro:परभणी - संपूर्ण मौसमात प्रचंड खंड देणाऱ्या पावसाचा आता परतीत मात्र समाधानकारक हजेरी लावण्याचा विचार दिसतोय. आज (बुधवारी) रात्री साडेआठ वाजल्यापासून जोरदार पाऊस बरसत असल्याने परभणी शहरातील नागरिकांसह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
Body:दरम्यान, परभणी जिल्ह्यात सरासरी 774.62 मिलिमीटर पाऊस पडत असतो; परंतु गेल्या काही वर्षात सुमारे 70-75 टक्के पाऊस पडत असल्याने पावसाचा मोठा खंड पडत आहे. त्यामुळे सातत्याने दुष्काळाचे चटके सहन करावे लागत असून, यावर्षी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यात परभणी जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या केवळ 68.87 टक्के पाऊस पडला आहे. आजपर्यंत प्रत्यक्षात 607.24 मिलिमीटर पाऊस पडायला हवा होता, परंतु प्रत्यक्षात 417 मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे अपेक्षित पावसाच्या 30 टक्क्यां हून अधिक खंड पडला आहे. तसेच हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ 62 टक्के आहे. त्यामुळे येणाऱ्या केवळ 18 दिवसांमध्ये 40 टक्के पाऊस पडणे अपेक्षित आहे; परंतु असे म्हणतात की, परतीचा पाऊस हा लहरी असतो, त्यामुळे तो पडला तर कुणीकडे पडतो, सर्वदूर आणि सम-समान पावसाची शक्यता फार कमी असते. त्यामुळे केवळ 18 दिवसात तब्बल 40 टक्के पावसाची पडणे शक्य नाही. त्यामुळे यावर्षी देखील दुष्काळाचा सामना रावा लागणार, हे निश्‍चित झाले आहे. कारण जिल्ह्यातील मासोळी, येलदरी, निम्न, दुधना, करपरा, दिग्रस, मुळी या मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये दहा ते वीस टक्के साठा पाणीसाठा झाला असला, तरी इतर 22 लहान-मोठ्या प्रकल्पात मात्र अजूनही मृतसाठाच आहे. त्यामुळे हे प्रकल्प भरण्यासाठी येणाऱ्या 40 दिवसात दमदार पाऊस होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, बुधवारी रात्री साडेआठ वाजता पावसाला सुरूवात झाली होती. रात्री अकरा वाजे नंतर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे परतीच्या पावसाने चांगलंच मनावर घेतली की काय, असेच वाटू लागले आहे. दरम्यान, हा पाऊस पिकांप्रमाणेच प्रकल्पांमध्ये पाणी साठवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा शेतकरी समाधान व्यक्त करू लागला आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- visConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.