ETV Bharat / state

परभणीत चार एकर ऊस जळून खाक, आग विझवताना एकजण जखमी

पाथरी तालुक्यातील जवळा झुटा येथे ४ एकर उसाच्या शेताला आग लागल्याची घटना घडली. या आगीत सर्व ऊस जळून खाक झाला.

जळालेला उस
author img

By

Published : Apr 30, 2019, 1:35 PM IST

परभणी - पाथरी तालुक्यातील जवळा झुटा येथे ४ एकर उसाच्या शेताला आग लागल्याची घटना घडली. या आगीत सर्व जळून खाक झाला. आग विझवण्यास गेल्यामुळे एकाचा हात भाजला आहे. दरम्यान वाढत्या तापमानामुळे शहरासह तालुक्यात आगीच्या घटना वारंवार घडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

जळालेला उस

जवळा झुटा येथे निरंजन राठोड यांची ४ एकर जमीन असून यात उसाची लागवड केलेली आहे. हा ऑक्टोबरमध्ये तोडणी झाल्यानंतर राहिलेल्या पाचटाची यंत्राद्वारे बारीक कुट्टी केली होती. या पाचटाला रविवारी दुपारी अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यात मुलगा राजेश राठोड यांचा डावा हात भाजला तर निरंजन यांच्या पत्नीच्या साडीने पेट घेतला. प्रसंगावधान राखल्याने पुढील अनर्थ टळला मात्र, संपूर्ण जळाल्याचे राठोड यांनी सांगितले.

आग विजवण्यासाठी जवळ पाण्याची व्यवस्था नसल्याने जळून खाक झाला. ही आग नेमकी कशाने लागली, हे मात्र समजू शकले नाही. जखमी राजेश राठोड यांना तातडीने आष्टी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आगीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी निरंजन राठोड यांनी पाथरी तहसिलदारांना केली आहे.

Intro:परभणी - पाथरी तालुक्यातील जवळा झुटा येथील शेतक-याच्या खोडवा उसातील कुट्टी केलेल्या पाचटाला आग लागून चार एकरातील हिरवा उस जळाला आहे. यावेळी आग विझवण्यास गेलेला शेतक-याचा मुलाचा हात भाजल्याची घटना घडली. दरम्यान, वाढत्या तापमानात शहरासह तालुक्यात आगीच्या घटना वारंवार घडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.Body:जवळा झुटा येथे शेतकरी निरंजन ठाकू राठोड, शेषकला निरंजन राठाेड, ठाकू देऊ राठोड यांची गट नं ६३ मध्ये चार एकर जमिन असून यात उसाची लागवड केलेली आहे. हा उस ऑक्टोबरमध्ये कारखाण्याला गेल्यानंतर या वर्षी पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने या शेतातील पाचटाची यंत्रा व्दारे कुट्टी केली होती. सहा महिने वयाच्या या उसातील कुट्टी केलेल्या पाचटाला रविवारी दुपारी अचानक आग लागली. ही आग नेमकी कशाने लागली, हे मात्र समजु शकले नाही. आग लागल्याचे लक्षात येताच या ठिकाणी या शेतक-याचा मुलगा राजेश निरंजन राठोड आणि शोभा राजेश राठोड हे वरच्या शेतात पालवी खांदत होते या वेळी यांनी आणि राहुल निरंजन राठोड यांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला यात राजेश राठोड यांचा डावा हात भाजला तर पत्नी शोभा यांच्या साडीने पेट घेतला होता. पण तेथे उपस्थित त्यांचा दीर राहुल याने वेळी प्रसंगावधान राखल्याने पुढील अनर्थ टळल्याचे शेतकरी निरंजन राठोड यांनी सांगीतले. दरम्यान, आग विजवण्यासाठी पाण्याची काही व्यवस्था नसल्याने हा चार एकर उस जळून खाक झाला. यात शेतक-याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, जखमी राजेश राठोड यांना तातडीने आष्टी येथील खाजगी दवाखाण्यात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या विषयी पाथरीच्या तहसीलदार यांना निवेदन देऊन या विषयी पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी निरंजन राठोड यांनी केली आहे.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत vis.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.