ETV Bharat / state

परभणीत पालकमंत्री नवाब मलिकांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण - नवाब मलिक बातमी

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने आज सकाळी मुख्य शासकीय समारंभात जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राजगोपालचारी उद्यानातील मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण
मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण
author img

By

Published : Sep 17, 2020, 2:39 PM IST

परभणी - येथील वसमत रोडवरील राजगोपालचारी उद्यानात आज (गुरुवार) पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. पालकमंत्री मलिक यांनी क्रांती चौक येथील हुतात्मा स्मारक येथे मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री नवाब मलिकांच्या हस्ते ध्वजारोहण

राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते आज सकाळी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राजगोपालचारी उद्यानातील मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तत्पूर्वी, ध्वजारोहण करून पोलीस प्रशासनाच्या वतीने मानवंदना देखील देण्यात आली. याशिवाय पालकमंत्री मलिक यांनी परभणी शहरातील क्रांती चौक या मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांचे केंद्रस्थान राहिलेल्या ठिकाणी भेट घेऊन त्या ठिकाणच्या हुतात्मा स्मारकावर श्रद्धांजली अर्पण केली. तसेच मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांची देखील भेटदेखील घेतली.

दरम्यान, मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमांसोबतच परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते तर जिल्हा परिषदेत अध्यक्षा निर्मला विटेकर, महानगरपालिकेत महापौर अनिता सोनकांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याशिवाय प्रशासकीय इमारत, पोलीस मुख्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय आदींसह सर्वच शासकीय कार्यालय आणि महाविद्यालय तसेच शाळांमध्ये देखील मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

मुख्य कार्यक्रमास आमदार सुरेश वरपूडकर, आमदार डॉ.राहुल पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला विटेकर, उपाध्यक्ष अजय चौधरी, महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, आयुक्त देविदास पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा - सोनपेठजवळ कार अपघातात एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.