ETV Bharat / state

परभणीच्या रेल्वे स्थानकात भीषण आग; कॅबिन, स्टोअररूम जळून खाक

परभणी रेल्वे स्थानकावर सायंकाळी ५ च्या सुमारास अचानक आग लागली. दरम्यान रेल्वे स्थानकातील एटीएमला लागून असलेल्या वेटिंग हॉलपर्यंत आग पोहोचली. ही आग एटीएमपर्यंत पोहोचते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु त्यापूर्वीच अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन ही आग आटोक्यात आणली.

parbhani
परभणीच्या रेल्वे स्थानकात भीषण आग
author img

By

Published : Dec 5, 2019, 8:53 PM IST

परभणी - परभणी रेल्वे स्थानकातील वेटिंग हॉलला आज सायंकाळी भीषण आग लागली. यात जीवितहानी झाली नसली तरी आरोग्य निरीक्षकांच्या केबिन आणि स्वच्छतेच्या साहित्याची स्टोअररूम जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. दरम्यान या आगीमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

parbhani
रेल्वे स्थानकावर उठलेला धुराळा

येथील रेल्वे स्थानकावर सायंकाळी ५ च्या सुमारास अचानक आग लागली आणि पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. दरम्यान रेल्वे स्थानकातील एटीएमला लागून असलेल्या वेटिंग हॉलपर्यंत आग पोहोचली. ही आग एटीएमपर्यंत पोहचते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु त्यापूर्वीच अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन ही आग आटोक्यात आणली.

परभणीच्या रेल्वे स्थानकात भीषण आग

हेही वाचा - जिंतुरमध्ये एसटीच्या धडकेत शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू, चालक अटकेत

आरोग्य निरीक्षकाच्या केबिनला मुख्यतः ही आग लागली होती. या केबिनमधील इलेक्ट्रिक वायरचे शॉर्टसर्किट होऊन आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत निरीक्षकाची केबिन पूर्णतः जळून खाक झाली. परंतु केबिनला लागूनच असलेल्या स्टोअर रूममधील स्वच्छतेचे साहित्य देखील जाळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय या आगीचा वणवा वेटींग हॉलमध्ये देखील पसरला होता. मात्र, हॉलमधील प्रवासी तेथून तत्काळ दूर गेल्याने जीवितहानी टळली. तसेच स्वच्छता गृहाच्या कर्मचाऱ्यांचे देखील यात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकाला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती.

हेही वाचा - परभणीच्या 'एटीएस'ची तीन भंगार विक्रेत्यांविरुद्ध कारवाई

Intro:

परभणी - परभणी रेल्वे स्थानकातील वेटिंग हॉलला आज सायंकाळी भीषण आग लागली. यात जीवित हानी झाली नसली तरी आरोग्य निरीक्षकाच्या केबिन आणि स्वच्छतेच्या साहित्याची स्टोररूम जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. दरम्यान या आगीमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.Body:

येथील रेल्वे स्टेशन मध्ये सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. दरम्यान रेल्वे स्टेशन मधील एटीएमला लागून असलेल्या या वेटिंग हॉलला ही आग लागल्याने ती आग एटीएम पर्यंत पोहचते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु त्यापूर्वीच अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन ही आग आटोक्यात आणली.
दरम्यान, आरोग्य निरीक्षकाच्या केबिनला मुख्यतः ही आग लागली होती। या केबिन मधील इलेक्ट्रिक वायरचे शॉर्टसर्किट होऊन आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीमध्ये निरीक्षकाची केबिन तर पूर्णतः जळून खाक झाली. परंतु केबिनला लागूनच असलेल्या स्टोअर रूम मधील स्वच्छतेचे साहित्य देखील जाळून खाक झाल्याचे सांगण्यात येते. शिवाय या आगीचा वणवा वेटींग हॉलमध्ये देखील पसरला होता. मात्र हॉलमधील प्रवासी तेथून तात्काळ दूर गेल्याने जीवित हानी टळली. तसेच स्वच्छता ग्रहाच्या कर्मचाऱ्यांचे देखील यात नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, रेल्वे स्टेशनला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- photo & pbn_railway_station_burn_vis_byte_vis_byte Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.