ETV Bharat / state

परभणीत दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणांवर हातोडा; 125 अतिक्रमणे पाडले - परभणी शहर अतिक्रमणे पाडले

वसमत रस्ता ते उघडा महादेव या परिसरातील 140 अतिक्रमणे काल (गुरुवारी) पाडली. तर आज देखील याच परिसरातील गजानन नगरमधील कालव्यापर्यंतची 125 अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झालेली ही कारवाई संध्याकाळी उशीरापर्यंत चालली. यामध्ये 6 घरे, दुकाने, पानटपऱ्या आणि संरक्षण भितींचे मोठ्या प्रमाणात पाडकाम करण्यात आले.

परभणी
परभणी
author img

By

Published : Feb 12, 2021, 9:58 PM IST

परभणी - शहर महानगरपालिकेच्या वतीने आज (शुक्रवारी) देखील अतिक्रमणधारकांवर हातोडा चालविण्यात आला. वसमत रस्ता ते उघडा महादेव या परिसरातील 140 अतिक्रमणे काल (गुरुवारी) पाडली. तर आज देखील याच परिसरातील गजानन नगरमधील कालव्यापर्यंतची 125 अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झालेली ही कारवाई संध्याकाळी उशीरापर्यंत चालली. यामध्ये 6 घरे, दुकाने, पानटपऱ्या आणि संरक्षण भितींचे मोठ्या प्रमाणात पाडकाम करण्यात आले.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी 30 फुटांचे अतिक्रमण -

परभणी शहर महानगरपालिकेच्यावतीने आज सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत उघडा महादेव ते गजानन नगर कॅनॉल दरम्यानची अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली. याठिकाणी नागरिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने तब्बल 30 फुटाचे अतिक्रमण केले होते. यातील 125 अतिक्रमणधारकांचे बांधकाम पडण्यात आले. यात 6 घरे, दुकाने, शटर, पानटपर्‍या, कंपाऊंट वॉल, दोन बाजूचे अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकण्यात आले. यावेळी मनपाचे 125 कर्मचारी, 8 जेसीबी, 2 पोकलॅन्ड, 1 रोलर, विद्युत तारा काढण्यासाठी मनपाचे क्रेन, तीन ट्रॅक्टर, 4 टिप्पर आदी तैनात करण्यात आले आहे.

उद्या देखील मोहीम सुरू राहणार - आयुक्त

सदर अतिक्रमण हटाव मोहिमेस आयुक्त देविदास पवार यांनी भेट घेऊन ही मोहीम उद्या (शनिवारी) सुद्धा चालू राहणार असल्याचे सांगितले. या मोहिमेत पथक प्रमुख प्रदिप जगताप, देविदास जाधव, महेश गायकवाड, शहर अभियंता वसीम पठाण यांच्या अधिपत्त्याखाली सहायक नगररचनाकार किरण फुटाणे, रईस खान, आरेस खान, सहायक आयुक्त श्रीकांत कांबळे, संतोष वाघमारे, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, लक्ष्मण जोगदंड, शेख शादाब, नयनरत्न घुगे, मेहराज अहेमद, श्रीकांत कुर्‍हा, मुकादम, लाईट विभागाचे प्रमुख सोहेल, उद्यान विभागाचे प्रमुख पवन देशमुख, अथर खान, मलेरिया विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त -

दरम्यान, पोलिसांनी अतिक्रमण मोहीम यशस्वी पार पाडण्यासाठी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. यासाठी नवा मोंठा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामेश्‍वर तट, अजय पाटील पोलीस फौजफाट्यासह उपस्थित होते. चोख बंदोबस्तामुळे अनुचित प्रकार घडला नाही. नागरीकांना पांगवून अतिक्रमण काढण्यात आले. काही नागरीकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेेतले. या ठिकाणी पडलेला मलबा काढून घेण्यात आला. नाल्यावरील ओटे, फरशा काढण्यात आल्या. तसेच याठिकाणी न्यायालयीन कामकाज पाहणाऱ्या विभागाचे इमाम शहा, बालाजी सोनवणे, राहुल दुथडे, लोंढे, बंडे यांनी मार्कींग केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.