ETV Bharat / state

आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगरची 255 कोटींची मालमत्ता जप्त; 'ईडी'ची कारवाई - गेश्वरी हॅचरीज आणि गंगाखेड

शेतकऱ्यांच्या नावे हजारो कोटी रुपयांचे परस्पर कर्ज काढून घोटाळा केल्या प्रकरणात आमदार रत्नाकर गुट्टे यांची मालमत्तेवर टाच आणली आहे. ईडीकडून ही कारवाई करण्यात येत आहे.

mla ratnaar gutte
आमदार रत्नाकर गुट्टे
author img

By

Published : Dec 24, 2020, 10:15 AM IST

Updated : Dec 24, 2020, 10:21 AM IST

परभणी - रासपचे गंगाखेड येथील एकमेव आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावे परस्पर हजारो कोटी रुपयांचे कर्ज उचलून ती रक्कम स्वतःच्या कंपन्यांमध्ये गुंतवली आहे. ही बाब स्पष्ट झाल्यानंतर आमदार गुट्टे यांच्या गंगाखेडसह परभणी, बीड आणि धुळे येथील 255 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून ही कारवाई करण्यात येत असून, आज (गुरुवारी) देखील ही कारवाई सुरू राहणार असल्याचे समजते.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याच्या माध्यमातूनआमदार रत्नाकर गुट्टे यांनी शेकडो शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतले होते. त्या प्रकरणी 'ईडी'कडे तक्रार आल्यानंतर 'ईडी'ने ही कारवाई केली आहे. महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या नावे उचललेल्या कर्जाची रक्कम त्यांनी गंगाखेड शुगर एनर्जी लिमिटेडच्या माध्यमातूनच त्यांच्या धुळे जिल्ह्यातील योगेश्वरी हॅचरीज आणि गंगाखेड येथील गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेडसह इतर कंपन्यांमध्ये गुंतवली आहे. ही बाब गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ईडीच्या तपासात स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

'जप्त केलेल्या मालमत्तेचे विवरण'

ईडीने बुधवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडचे 247 कोटी किमतीचे यंत्र, त्याचप्रमाणे 5 कोटी रुपयांची जमीन, धुळे जिल्ह्यातील योगेश्वरी हॅचरीज तर गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेडच्या परभणी, बीड आणि धुळे येथील बँकांमध्ये असलेल्या सुमारे दीड कोटी रुपये किमतीच्या गुंतवणूक तसेच गंगाखेड शुगर्स लिमिटेडची 1 कोटी 90 लाख रुपये किमतीचे समभाग अशी एकूण 255 कोटीची मालमत्ता करण्यात आली आहे.

'शेतकऱ्यांच्या नावे परस्पर उचलले कोट्यवधींचे कर्ज'

दरम्यान, शेतकऱ्यांच्या नावे तब्बल दहा हजार कोटींपेक्षा अधिक कर्ज परस्पर उचलल्याचा आरोप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर आहे. तत्कालीन गंगाखेड चे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी याप्रकरणी पुराव्यानिशी तक्रार दिली होती. शिवाय हा प्रश्न सामाजिक न्यायमंत्री तथा तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानसभेत मांडून कारवाईची मागणी देखील केली होती. त्यानंतर सुरू झालेल्या या तपासात ईडीने आत्तापर्यंतची कारवाई केली आहे.

'कारागृहात राहून जिंकली विधानसभेची लढाई'

शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कोट्यवधींचे कर्ज घेतल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार रत्नाकर गुट्टे यांनी कारागृहातूनच 2019 मध्ये गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते जिंकले देखील. 26 मार्च 2019 रोजी रत्नाकर गुट्टे यांना औरंगाबाद येथील सीआयडी पथकाने अटक करुन गंगाखेडच्या कनिष्ठ न्यायालयात हजर केले होते. यानंतर हे प्रकरण बरेच दिवस औरंगाबाद उच्च न्यायालयात चालले. तिथे त्यांना जामीन मिळाला नाही. शेवटी उच्च न्यायालयातून त्यांनी सर्वोच न्यायालयात दाद मागितली आणि तिथेही अनेक तारखा झाल्यानंतर त्यांना तब्बल 346 दिवसानंतर अर्थात 5 मार्च 2020 रोजी जामीन मिळाला आहे. ते सुमारे वर्षभर कारागृहात राहिले.

Last Updated : Dec 24, 2020, 10:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.