ETV Bharat / state

परभणीत महापालिकेच्या कृत्रिम हौदावर 'श्रीं'च्या विसर्जनासाठी गर्दी - गणेश मिरवणूक

अनंत चतुर्दशी निमित्त दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते. या पार्श्वभूमीवर शहरात महापालिकेने मूर्ती संकलन केंद्र तयार केले आहेत. याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहण्यात येत आहे.

परभणीत तयार करण्यात आले 'कृत्रिम' हौद
author img

By

Published : Sep 12, 2019, 7:51 PM IST

परभणी - शहरातील विविध गणेश मंडळांच्या तसेच घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम हौदावर विसर्जनासाठी गर्दी केली आहे. वसमत रोडवरील जलशुद्धीकरण केंद्रासमोर हे हौद तयार करण्यात आले होते. याठिकाणी श्रींच्या मूर्तींचे संकलन करून त्याचे हौदात विसर्जन केले जात आहे.

परभणीत तयार करण्यात आले 'कृत्रिम' हौद
आज गुरुवारी अनंत चतुर्दशी निमित्त दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते. या पार्श्वभूमीवर शहरात महापालिकेने मूर्ती संकलन केंद्र तयार केले आहेत. शिवाय वसमत रोड वरील जलशुद्धीकरण केंद्रासमोर उभारण्यात आलेल्या भल्यामोठ्या हौदात श्रींचे विसर्जन केल्या जात आहे. याठिकाणी महापालिकेच्यावतीने सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील मूर्तीं सोबतच वसमत रोड, कारेगाव, खानापूर, औद्योगिक वसाहत, आसोला, नांदगाव तसेच परिसरातील इतर गावांमधील श्रींच्या मूर्तींचे विसर्जन या ठिकाणी होत आहे. दरम्यान, महापालिकेने श्रींच्या मूर्ती आणि निर्माल्य संकलनासाठी शहरांतर्गत विविध ठिकाणी व्यवस्था केली आहे. यामध्ये शिवाजी रोड वरील बाल विद्या मंदिर शाळेत तर जिंतूर रोडवरील गणपती चौक, दर्गा रोडवरील कृत्रिम रेतन केंद्र, खंडोबा बाजार, धार रोडवरील दुर्गादेवी मंदिर, वसमत रोडवरील समाधान कॉलनी, काळी कमान, देशमुख हॉटेल परिसर आणि शिवशक्ती बिल्डिंग जवळ श्रींच्या मुर्ती संकलित करणारे केंद्र तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी घरगुती गणपती गोळा केल्या जात आहेत. या मुर्तींचे जलशुद्धीकरण केंद्राजवळील कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात येत आहे. दरम्यान, दुपारी चार वाजेनंतर या केंद्राजवळ विसर्जनासाठी विविध गणेश मंडळे आणि घरगुती श्रींच्या विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी सुरू झाली होती.हेही वाचा - नंदुरबारमध्ये विसर्जन मिरवणूक उत्साहात; ढोल-ताशांच्या गजरात खासदार हिना गावितांनीही केले नृत्य

रात्री उशिरा पर्यंत चालणार श्रींची मिरवणूक आणि देखावे -

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे परभणी शहरातील विविध गणेश मंडळांच्या श्रींची मिरवणूक आणि देखाव्यांचे सादरीकरण रात्री उशिरा पर्यंत चालणार आहे. यावेळी रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणुकीसाठी वेळ देण्यात आला असून यामुळे संध्याकाळी आठच्या सुमारास नारायण चाळीतून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होईल. अष्टभुजा देवी चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार आणि पुढे शिवाजी चौकातपर्यंत या मिरवणुका चालतील. सर्वात प्रथम मोठा मारुती परिसरातील मानाच्या गणपतीची पालखी जाते. यानंतर विविध गणेश मंडळ देखाव्यांसह मिरवणुकित सहभागी होतात. देखावे पाहण्यासाठी परभणीकर रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करतात.
हेही वाचा - हिंगोलीत भाविकांची चिंतामणी विघ्नहर्ता गणपतीचा दर्शनासाठी अलोट गर्दी

Intro:परभणी - शहरातील विविध गणेश मंडळांच्या तसेच घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी महापालिकेने वसमत रोडवरील जलशुद्धीकरण केंद्रासमोर निर्माण केलेल्या कृत्रिम हौदावर मंगळवारी दुपारनंतर तरुणांची तसेच नागरिकांची गर्दी झाली आहे. याठिकाणी श्रींच्या मूर्तींचे संकलन करून त्याचे हौदात विसर्जन केले जात आहे.

Body:आज अनंत चतुर्दशी निमित्त दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते. या पार्श्वभूमीवर शहरात महापालिकेने ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र तयार केले आहेत. शिवाय वसमत रोड वरील जलशुद्धीकरण केंद्रासमोर उभारण्यात आलेल्या भल्यामोठ्या हौदात श्रींचे विसर्जन केल्या जात आहे. याठिकाणी महापालिकेच्यावतीने सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील मूर्त्यां सोबतच वसमत रोड, कारेगाव, खानापूर, औद्योगिक वसाहत,आसोला, नांदगाव तसेच परिसरातील इतर गावांमधील श्रींच्या मूर्तींचे विसर्जन या ठिकाणी होत आहे. दरम्यान, महापालिकेने श्रींच्या मूर्ती आणि निर्माल्य संकलनासाठी शहरांतर्गत विविध ठिकाणी व्यवस्था केली आहे. ज्यामध्ये शिवाजी रोड वरील बाल विद्या मंदिर शाळेत तर जिंतूर रोडवरील गणपती चौक, दर्गा रोडवरील कृत्रिम रेतन केंद्र, खंडोबा बाजार, धार रोडवरील दुर्गादेवी मंदिर, वसमत रोडवरील समाधान कॉलनी, काळी कमान, देशमुख हॉटेल परिसर आणि शिवशक्ती बिल्डिंग जवळ श्रींच्या मुर्त्या संकलित करणारे केंद्र तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी घरगुती गणपती गोळा केल्या जात आहेत. या मुर्त्यांचे जलशुद्धीकरण केंद्राजवळील कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात येत आहे. दरम्यान दुपारी चार वाजेनंतर या केंद्राजवळ विसर्जनासाठी विविध गणेश मंडळे आणि घरगुती श्रींच्या विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी सुरू झाली होती.

Conclusion: " उशिरा पर्यंत चालणार श्रींची मिरवणूक आणि देखावे"

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे परभणी शहरातील विविध गणेश मंडळांच्या श्रींची मिरवणूक आणि देखाव्यांचे सादरीकरण रात्री उशिरा पर्यंत चालणार आहे. यावेळी रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणुकीसाठी वेळ देण्यात आला असून, त्यामुळे संध्याकाळी आठच्या सुमारास नारायण चाळीतून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होईल. अष्टभुजा देवी चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार आणि पुढे शिवाजी चौकातपर्यंत या मिरवणुका चालतील. सर्वात प्रथम मोठा मारुती परिसरातील मानाच्या गणपतीची पालखी जाते. त्यानंतर विविध गणेश मंडळे देखाव्यांसह मिरवणुकित सहभागी होतात. देखावे पाहण्यासाठी परभणीकर रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करतात.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_shri_visargan_vis
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.