ETV Bharat / state

Petrol Diesel Price in Parbhani : वाहन खरेदी रोखीने अन् इंधन खरेदी कर्जाने; पेट्रोल-डिझेल दरवाढीने परभणीकर संतापले - परभणीत सर्वाधिक इंधन दरवाढ

राज्यात सर्वाधिक दराने पेट्रोल-डिझेलची विक्री परभणीत (Petrol Diesel Price Hike in Parbhani) होत असते. सध्या पेट्रोलचा आजचा (सोमवारी) दर 121.79 रुपये प्रति लिटर आहे. तर पावर पेट्रोलचा दर तब्बल 128.2 पैसे प्रति लिटर एवढा झाला आहे. या शिवाय डिझेलने देखील शंभरी पार केली असून, 104.39 रुपये दराने विक्री होत आहे.

parbhani fuel hike
परभणीत इंधन भरताना वाहनचालक
author img

By

Published : Apr 4, 2022, 7:06 PM IST

Updated : Apr 4, 2022, 7:21 PM IST

परभणी - देशात गेल्या काही दिवसांपासून इंधन दराचा भडका (Fuel Hike) उडत आहे. त्यातच राज्यात सर्वाधिक दराने पेट्रोल-डिझेलची विक्री परभणीत (Petrol Diesel Price Hike in Parbhani) होत असते. सध्या पेट्रोलचा आजचा (सोमवारी) दर 121.79 रुपये प्रति लिटर आहे. तर पावर पेट्रोलचा दर तब्बल 128.2 पैसे प्रति लिटर एवढा झाला आहे. या शिवाय डिझेलने देखील शंभरी पार केली असून, 104.39 रुपये दराने विक्री होत आहे. त्यामुळे कोणीतरी आपल्या खिशात हात घालून अधिकचे पैसे काढून घेत असल्याची भावना परभणीकरांमधून व्यक्त होत आहेत.

प्रतिक्रिया देताना वाहनचालक

इंधनदरावरून परभणी कायम चर्चेत - परभणीतील पेट्रोल दराचा विषय हा कायम चर्चेत असतो. महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक वेळा देशात परभणीत विक्री होणारा पेट्रोलचा दर सर्वाधिक आढळून आला आहे. त्यामुळे फारसे उद्योगधंदे नसणाऱ्या लहानशा या शहरातील वाहनधारक मेटाकुटीला आले आहेत. 'जगात जर्मनी भारतात परभणी' या उक्तीप्रमाणे परभणीचे नाव यामुळे नेहमीच चर्चेत राहते.

वर्षभरात 22 रुपयांनी वाढले दर - गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असणारे इंधनाचे दर रशिया-युक्रेन युद्धामुळे अचानक वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्याचे सांगितले जाते. इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्यावर्षी म्हणजे 14 मार्च 2021 रोजी पेट्रोल 99.66 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत होते. मात्र, गेल्या 12 महिन्यात यात 22.12 रुपयांनी वाढ झाली आहे. आज, सोमवारी पेट्रोलचे दर 41 पैश्यानी वाढल्याने 121 रुपये 39 पैसे प्रति लिटरने विकले जात आहे. तसेच पावर (स्पीड) पेट्रोलची किंमत 128.2 रुपये प्रति लिटर एवढी झाली. तर डिझेल 42 पैश्यानी वाढून 104.38 पैसे दराने विकल्या जात आहे. हे तीनही दर राज्यातील सर्वाधिक दर असून, यामुळे परभणीकर अक्षरशः परेशान झाले आहेत. आता वाहन खरेदी रोखीने करावी लागणार आणि इंधनासाठी मात्र कर्ज घ्यावे लागेल, अशी भावना वाहनचालक व्यक्त करू लागले आहेत.

'यामुळे आहेत, परभणीत सर्वाधिक दर - परभणी जिल्ह्यात इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, यासह रिलायन्स, एस्सार आदी खासगी कंपन्यांचे सुमारे दीडशे पेट्रोल पंप आहेत. या सर्व पेट्रोल पंपाना पुरवठा होणारे इंधन प्रथम मुंबई रिफायनरीतून सोलापूर आणि मनमाड येथील डेपोला होतो. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पंपांसाठी सोलापूर, तर इंडियन पेट्रोलियम व भारत पेट्रोलियमला मनमाड येथून पेट्रोल आणि डिझेलची आवक होत असते. ही दोन्ही शहरे परभणीपासून सुमारे 300 ते 350 किमी दूर आहेत. ज्यामुळे येथे आयात होणाऱ्या इंधनाच्या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. ज्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर दिसून येतो. वाहतुकीवर होणाऱ्या खर्चाचा भुर्दंड मात्र या ठिकाणच्या नागरिकांना सहन करावा लागत असल्याने परभणीकरांच्या संतापात आणखीन भर पडली आहे.

Last Updated : Apr 4, 2022, 7:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.