ETV Bharat / state

चिक्की घोटाळ्याची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली होऊ द्या, धनंजय मुंडेंचे पंकजांना आव्हान

मुंडे म्हणाले,की भाजप सरकारच्या १६ मंत्र्यांचे ९० हजार कोटींचे घोटाळे मी पुराव्यानिशी बाहेर काढले. माझा एकही पुरावा सरकार खोटे ठरवू शकला नाही. पोषण आहार आणि चिक्कीच्या घोटाळ्याचे पुरावे मी सभागृहात मांडले. ते न्यायालयाने देखील मान्य केले आहेत. त्यामुळे चिक्कीचे कंत्राट रद्द करण्यात आले.

author img

By

Published : Apr 13, 2019, 1:07 PM IST

धनंजय मुंडे

परभणी - तुमच्या चिक्की आणि मोबाईल घोटाळ्याची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली होऊ द्या, असा पलटवार धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर केला. ते जिंतूर येथील राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत होते. धनंजय मुंडे हे तोडपाणी करणारे आहेत, असा आरोप काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना ते बोलत होते.

जिंतूरच्या सभेत बोलताना धनंजय मुंडे

धनंजय मुंडे म्हणाले, की पंकजा मुंडे यांनी आमदार विजय भांबळे आणि माझ्यावर तोडपाणी करणारे आमदार म्हणून टीका केली, असे असेल तर तुमच्या अध्यक्षतेखाली माझी चौकशी करा. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. पण, तुमच्या चिक्की घोटाळ्याची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली होऊ द्या.

मुंडे म्हणाले,की भाजप सरकारच्या १६ मंत्र्यांचे ९० हजार कोटींचे घोटाळे मी पुराव्यानिशी बाहेर काढले. माझा एकही पुरावा सरकार खोटे ठरवू शकला नाही. पोषण आहार आणि चिक्कीच्या घोटाळ्याचे पुरावे मी सभागृहात मांडले. ते न्यायालयाने देखील मान्य केले आहेत. त्यामुळे चिक्कीचे कंत्राट रद्द करण्यात आले.

यावेळी त्यांनी परभणीचे युतीचे उमेदवार जाधव यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, की जाधव यांच्यासारखा धनदांडगा माणूस पुन्हा खासदार झाला तर तुमचे काही खरे नाही. त्यामुळे गरीब घरातला तरुण राजेश विटेकर यांना निवडून द्या.

Intro:परभणी - जिंतूर येथे काही दिवसांपूर्वी सभा घेऊन भाजपच्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर तोडपाणी करणारे आमदार म्हणून टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना धनंजय मुंडे यांनी आमच्या तोडपाणी चौकशी तुम्ही तुमच्या अध्यक्षतेखाली करा ; आणि तुमच्या चिक्की आणि मोबाईल घोटाळ्याची चौकशी आमच्या अध्यक्षतेखाली होऊन जाऊ द्या, असे आव्हान दिले.Body:जिंतूर येथे शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या मैदानावर राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत धनंजय मुंडे बोलत होते. या सभेच्या व्यासपीठावर खासदार माजीद मेमन, आमदार विजय भांबळे, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, आमदार मधुसुदन केंद्रे, उमेदवार राजेश विटेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला सुरेश वरपूडकर, आमदार भांबळे, खासदार मेमन यांची भाषणे झाली. त्यानंतर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, याच ठिकाणावरून आमच्या भगिनी पंकजा मुंडे यांनी आमदार विजय भांबळे व माझ्यावर तोडपाणी करणारे आमदार म्हणून टीका केली. सध्या सरकार तुमचा आहे, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही पालकमंत्री देखील आहात. मग एक काम करा, आम्ही जी काही तोडपाणी केली असेल त्याची चौकशी तुम्ही करा. या चौकशी समितीचे अध्यक्ष देखील तुम्ही व्हा. मात्र त्याच वेळी तुम्ही जो चिक्की आणि मोबाईल घोटाळा केला, त्याचीही चौकशी व्हायला पाहिजे. त्या चौकशी समितीचा अध्यक्ष मला नेमा. काय अडचण आहे ? भाजप सरकारच्या 16 मंत्र्यांचे 90 हजार कोटींचे घोटाळे आणि भ्रष्टाचार पुराव्यानिशी मी बाहेर काढले आहेत. माझा एकही पुरावा हे सरकार खोटे ठरू शकले नाही. पोषण आहार आणि चुकीच्या घोटाळा मी सभागृहात मांडलेले मुद्दे सुप्रीम कोर्टाने देखील मान्य केले. त्यामुळे चिक्कीचे टेंडर देखील रद्द झाले होते. तुमचा एक एक पाप उघड पडत आहे, अशीही टीका धनंजय मुंडे यांनी केली.
तसेच देशाची आणि परभणीची देखील लोकशाही धोक्यात असल्याचे मुंडे म्हणाले. खासदार जाधव यांच्यासारखा दाांड माणूस पुन्हा खासदार झाला तर तुमचं काही खरं नाही. त्यामुळे तुम्ही गरीब आणि विनम्र राजेश विटेकर यांना प्रेम रुपी मतदान देऊन दिल्लीत पाठवा. तेव्हा तुमचा विकास होईल, असेही धनंजय मुंडे म्हणाले. या सभेला जिंतूर विधानसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- गिरीराज भगत, परभणी
- सोबत :- सभा visuals, धनंजय मुंडे भाषण.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.