ETV Bharat / state

परभणी मेडीकल कॉलेजसाठी राज्य सरकारच्या हालचाली; खासदारांसह शिष्टमंडळ शरद पवारांच्या भेटीला - delegation of MPs will meet Sharad Pawar

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालायाची निर्मिती करावी, या मागणीसाठी परभणीकरांनी जोर लावला आहे. या विषयी खासदारांसह एक शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली.

delegation along with MPs had gone to meet Sharad Pawar to make Parbhani Medikar College
परभणी मेडीकल कॉलेजसाठी राज्य सरकारच्या हालचाली; खासदारांसह शिष्टमंडळ शरद पवारांच्या भेटीला
author img

By

Published : Dec 11, 2020, 5:25 PM IST

परभणी - परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे, या मागणीसाठी आता राज्य सरकारच्या स्तरावर हालचालींनी वेग घेतला आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी या मागणीसाठी लोक आंदोलन छेडले होते. या प्रकरणी शुक्रवारी एका शिष्टमंडळाने खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार व वैद्यकीय शिक्षण राज्य मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्य सरकारच्या स्तरावर हालचालींना वेग आल्याची माहिती खासदार संजय जाधव यांच्या वतीने देण्यात आली आहे.

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालायाची निर्मिती करावी, या मागणीसाठी परभणीकरांनी जोर लावला आहे. खासदार संजय जाधव यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणीला मिळावे, यासाठी सलग आंदोलन केले होते. परभणीतील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा या आंदोलनात सहभाग होता. खासदारांच्या सलग आंदोलनाचा परिणाम राज्य सरकारवर दिसून आला आहे. महाविद्यालयाच्या परवानगीसाठी शुक्रवारी एक शिष्टमंडळ खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना भेटले. त्यानंतर या शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान देशमुख यांनी परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यायाची निर्मिती करण्यासाठी आपण सहमत असल्याचे सांगत वैद्यकीय शिक्षणचे महासंचालक डॉ. तात्याराव लहाने व सचिव सौरभ विजय यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी परभणीतील 50 एकर जागा या महाविद्यालयासाठी हस्तांतरीत करण्याचे आदेश परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या शिष्टमंडळात खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार मेघना बोर्डीकर, डॉ.राम शिंदे, अतुल सरोदे यांची उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.