ETV Bharat / state

पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा - parbhani

न्यायाधीश इनामदार यांनी घटनेचे गांभीर्य पाहून आरोपीस कलम ३०२ नुसार मृत्यूदंड, कलम ३७६ नुसार जन्मठेप, पुरावा नष्ट करण्याचे कलम २०१ अन्वये ७ वर्ष शिक्षा व १० हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली आहे.

vishnu gore death penalty parbhani
अपर जिल्हा व सत्र न्यायालय
author img

By

Published : Feb 19, 2020, 9:20 AM IST

परभणी - पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचा निर्घुणपणे खून करून मृतदेह विहिरीत फेकणार्‍या विष्णु गोरेला गंगाखेड न्यायालयात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी. इनामदार यांनी काल (मंगळवारी) हा निकाल दिला. विशेष म्हणजे, गंगाखेड न्यायालयाची निर्मिती झाल्यानंतर फाशीच्या शिक्षेचा हा पहिलाच निकाल असल्याने तो ऐतिहासिक आहे.

माहिती देताना वकील

ही घटना २०१६ ला सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे घडली होती. शेळगाव येथील ५ वर्षीय बालिकेचे वडील हयात नसल्याने तिचे आजोबा तिचा सांभाळ करीत होते. २७ ऑक्टोबर २०१६ रोजी ही बालिका बेपत्ता झाल्यामुळे २९ ऑक्टोबर २०१६ रोजी तिच्या आजोबांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनी शेळगाव येथील विश्वांभर लोंढे यांच्या शेतातील विहिरीत पोत्यात बांधून ठेवलेल्या अवस्थेत या बालिकेचा मृतदेह आढळून आला होता. बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले होते. या प्रकरणी पोलीसांनी कलम ३०२, ३७६ अ २०१ व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ३ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

तपासादरम्यान पोलीसांनी शेळगाव येथील विष्णु मदन गोरे याला ताब्यात घेतले. तपासात गोरे यानेच ५ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या केल्याचे निष्पन्न झाले. तत्कालीन तपास अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, सह. पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर यांनी १० एप्रिल २०१७ रोजी आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. यात गंगाखेड अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.जी. इनामदार यांनी २३ साक्षीदार तपासले. यात पीडितेचे आजोबा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल, वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरली. आरोपीने अत्यंत क्रुरतेने ५ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घुणपणे खून केल्याचे सिद्ध झाले.

न्यायाधीश इनामदार यांनी घटनेचे गांभीर्य पाहून आरोपीस कलम ३०२ नुसार मृत्युदंड, कलम ३७६ नुसार जन्मठेप, पुरावा नष्ट करण्याचे कलम २०१ अन्वये ७ वर्ष शिक्षा व १० हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणी सह. सरकारी वकील सचिन वाकोडकर यांनी काम पाहिले असून त्यांना जिल्हा सरकारी वकील डी.यु. दराडे यांचे मार्गदर्शन व सचिन पोळ, सुर्यकांत चौधरी, भगवान यादव यांचे सहकार्य मिळाले.

हेही वाचा- परभणीच्या उरूस यात्रेत व्यापाऱ्यांकडून मोठा शस्त्र साठा जप्त; 4 जण ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.