ETV Bharat / state

संचारबंदीत बेशिस्ती पडली महागात; गंगाखेडात ऑटोरिक्षा, किराणा व लॉजचालकावर गुन्हे दाखल

'कोरोना विषाणू'चा सामना करण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीत बेशिस्त वागणे गंगाखेडच्या तीन जणांना महागात पडले आहे.

परभणी
परभणी
author img

By

Published : Mar 25, 2020, 7:26 PM IST

परभणी - 'कोरोना विषाणू'चा सामना करण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीत बेशिस्त वागणे गंगाखेडच्या तीन जणांना महागात पडले आहे.

संचारबंदीत बेशिस्ती पडली महागात

एका ऑटो चालकाला सात प्रवाशांना बसवून परळी रोडने जात असताना पकडून पोलिसांनी त्याच्यावर कलम 144 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तर शहरातील किराणा दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून सामानाची विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिवाय रात्री लॉज उघडी ठेवणाऱ्या लॉज चालकाविरुद्ध देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

परभणी जिल्ह्यात अद्याप कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नसला तरी संशयित मात्र मोठ्या प्रमाणात जिल्हा रुग्णालय तसेच तालुक्यांच्या आरोग्य केंद्रांमध्ये दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हात देखील संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीचे कायदे देखील कडक करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणीही गर्दी जमा करता कामा नये, अशा कडक सूचना आहेत. असे असताना देखील काल मंगळवारी सायंकाळी पाच वाजता ऑटोचालक मारुती तांदळे हा त्याच्या ऑटोमध्ये तब्बल 7 प्रवासी बसवून त्यांना कोदरी रोडने परळीकडे नेत होता. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्याला अडवून त्याच्यावर कलम 144 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

दुसऱ्या प्रकरणात गंगाखेड शहरात सायंकाळी 6.30 वाजता गस्ती दरम्यान पोलिसांना दत्त मंदिर परिसरातील दत्तात्रय किराणा दुकान चालू असल्याचे आढळले. या दुकानाच्या समोर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. किरण दुकानदार माधव सानप हा सामान विक्री करण्यासाठी गर्दी जमवत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी कलम 51 आणि आपत्ती व्यवस्थापन कलम 2005 नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

तसेच तिसऱ्या प्रकरणात गंगाखेड पोलिसांना रात्री उशिरा गस्ती दरम्यान बस स्थानकासमोरील आनंद लॉज चालू असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी लॉज चालक माणिक घुमरे याच्याविरुद्ध कलम 51 आणि आपत्ती व्यवस्थापन कलम 2005 नुसार गुन्हा दाखल केला. या तीनही व्यक्तींना संचारबंदी दरम्यान असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी न करणे महागात पडले आहे.

अशाच पद्धतीने जिल्ह्यातील इतर अनेक तालुक्यांमध्ये किराणा दुकाने सुरू आहेत. अनेक चालक प्रवासी भाडे घेऊन फिरताना दिसत आहेत. तसेच लॉज चालक, बार, ढाबेवालेदेखील चोरमार्गाने व्यवसाय करीत आहेत. पोलिसांना यांच्यावरही करडी नजर ठेवावी लागेल, तरच कोरोनाच्या विषाणू विरुद्धचा लढा जिंकता येईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.