परभणी - पक्षात प्रामाणिकपणे काम करून सुद्धा भाजपने माझी उमेदवारी डावलली. केवळ कुरघोडीच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांचा मावळा या नात्याने मला बाजूला टाकण्याचं काम भाजपने केल्याचा गंभीर आरोप भाजपचे बंडखोर तथा मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी केला आहे. तसेच विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी गेली बारा वर्षे आपली आमदारकी केवळ गुत्तेदारी आणि चेले-चपाटे पोसण्यासाठी उपभोगल्याचा आरोप सुद्धा पोकळे यांनी केला आहे.
शहरातील एका हॉटेलमध्ये आज (शनिवारी) सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार रमेश पोकळे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत संभाजी सेनेचे परमेश्वर शिंदे, विठ्ठल तळेकर व अन्य काही पदाधिकारी उपस्थित होते.
गोपीनाथ मुंडेंचा मावळा असल्याने माझी उमेदवारी डावलली; भाजपचे बंडखोर रमेश पोकळे यांचा आरोप - गोपीनाथ मुंडे
केवळ कुरघोडीच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांचा मावळा या नात्याने मला बाजूला टाकण्याचं काम भाजपने केल्याचा गंभीर आरोप भाजपचे बंडखोर तथा मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी केला आहे.