ETV Bharat / state

भाजप सरकारने तुमच्या भावनांचा खेळ मांडलाय; डॉ.अमोल कोल्हे यांनी परभणीत साधला युवकांशी संवाद - yuva sanvad NCP Parbhani

भाकर मिळाली नाही तरी चालेल पण एखाद्याला शिक्षा झालीच पाहिजे, असा विचार करण्याची चूक तरुणांनी करू नये. सैन्य कधीच रिकाम्या पोटाने लढत नसते. दुर्दैवाने, भाजप सरकारने तरुणांच्या याच भावनांचा खेळ मांडला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज(22 ऑगस्ट) परभणीत केली.

डॉ.अमोल कोल्हे यांनी परभणीत साधला युवकांशी संवाद
author img

By

Published : Aug 22, 2019, 11:58 PM IST

परभणी - भाकर मिळाली नाही तरी चालेल पण एखाद्याला शिक्षा झालीच पाहिजे, असा विचार करण्याची चूक तरुणांनी करू नये. सैन्य कधीच रिकाम्या पोटाने लढत नसते. दुर्दैवाने, भाजप सरकारने तरुणांच्या याच भावनांचा खेळ मांडला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (22 ऑगस्ट) परभणीत केली. डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त परभणीतील शिवाजी महाविद्यालयात सायंकाळी पार पडलेल्या 'युवक संवाद' कार्यक्रमाला हजेरी लावून युवकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

डॉ.अमोल कोल्हे यांनी परभणीत साधला युवकांशी संवाद

शैक्षणिक प्रश्नांवर उत्तर देताना कोल्हे यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठा गोंधळ असल्याचा आरोप केला. विना अनुदानित संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण नाकारल्या जाते. तर उच्च माध्यमिक शिक्षकांना वेतन नाही. हे सरकार 24 हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असताना पवित्र पोर्टलवर फक्त पाच हजार जागा भरत आहे. शिक्षण क्षेत्राचा अक्षरशः खेळखंडोबा झाला आहे. तो दूर करायचा असेल तर सरकार बदला, असेही कोल्हे म्हणाले.

यावेळी शिवाजी महाविद्यालयासह शहरातील इतर महाविद्यालयातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला माजी महापौर प्रताप देशमुख, जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार, विधानसभा प्रमुख शंकर भागवत, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे गंगाधर जवंजाळ, सुमित परिहार यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनीही हजेरी लावली होती.

Intro:परभणी - भाकर मिळाली नाही तरी चालेल पण एखाद्याला शिक्षा झालीच पाहिजे, मुळात असा विचार करण्याची चूक तुम्ही (तरुणांनी) करू नये. सैन्य कधीच रिकाम्या पोटाने लढत नसतं. आणि दुर्दैवाने भाजप सरकारने तुमच्या याच भावनांचा खेळ मांडला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (गुरुवारी) परभणीत केली. ते शहरातील शिवाजी महाविद्यालयात सायंकाळी झालेल्या युवक संवाद कार्यक्रमात बोलत होते.

Body:राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त परभणीत आलेल्या डॉ.अमोल कोल्हे यांनी या संवाद कार्यक्रमाला हजेरी लावून युवकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी व्यासपीठावर माजी महापौर प्रताप देशमुख, जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार, विधानसभा प्रमुख शंकर भागवत, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे गंगाधर जवंजाळ, सुमीत परिहार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवाजी महाविद्यालयासह शहरातील इतर महाविद्यालयातील तरुण-तरुणी डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी संवाद साधण्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तरुणांनी अमोल कोल्हे यांना राजकीय, सामाजिक, तसेच शैक्षणिक आणि वैचारिक प्रश्न देखील विचारले. त्या प्रश्नांना अमोल कोल्हे यांनी उत्तरे देऊन युवकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी अमोल कोल्हे म्हणाले, 'मुळात भाकर नसली तरी चालेल पण याला शिक्षा द्या, त्याला शिक्षा द्या, या अशा तुमच्या विचारांचा भाजप सरकारने गैरफायदा घेतला आहे. अरे विचारा या सरकारला आम्हाला भाकर का मिळत नाही ? नोकरी का देत नाहीत ? आणि हा राग तुम्हाला व्यक्त करण्यासाठी तुमच्या हातात मतदानाचे हत्यार आहे. येणाऱ्या निवडणुकीत कोणाला मतदान करायचं, हे मोठं हत्यार तुमच्याकडे आहे.
येणाऱ्या निवडणुकीत तुमच्या स्मार्ट फोनवर मेसेज येतील, ते खरे की खोटे हे तपासा, मात्र दुर्दैवाने ते तुम्ही पाहत नाहीत, आला मेसेज की करा फॉरवर्ड असे करू नका. तुम्ही नव मतदार आहात. भविष्याचा विचार करा, असा सल्ला देखील कोल्हे यांनी दिला.
तसेच शैक्षणिक प्रश्नांवर उत्तर देताना कोल्हे यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठा गोंधळ असल्याचे सांगितले. विना अनुदानित संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण नाकारल्या जाते. तर उच्च माध्यमिक शिक्षकांना वेतन नाही, त्यामुळे त्यांच्या घरात दोन पैसे येत नाहीत. त्यांच्या मुलांना दवाखान्यात न्यायला त्यांच्याकडे सध्या पैसा नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच हे सरकार 24 हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असताना पवित्र पोर्टलवर फक्त पाच हजार जागा भरत आहे. शिक्षण क्षेत्राचा अक्षरशः खेळखंडोबा झाला आहे,आणि तो दूर करायचा असेल तर सरकार बदला. तरच या गोष्टी बदलायला ताकत मिळेल, असेही शेवटी कोल्हे म्हणाले.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- amol kolhe talking vis & program vis 1 & 2

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.