परभणी - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, मनी लाँन्ड्रिंग प्रकरणात जुन्या मालमत्तांच्या व्यवहारांप्रकरणी ईडीने आज बुधवारी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांना मुंबईत अटक केली. या अटकेनंतर परभणीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष ( Minister Nawab Malik arrest bjp celebrate parbhani ) केला. तसेच, नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची देखील मागणी कार्यकर्त्यांनी केली.
हेही वाचा - 15 हजार फूट उंच हिमशिखरावर शिवजयंती! परभणीच्या गिर्यारोहकांचे अनोखे अभिवादन
राजीनामा घेऊन कठोर कारवाईची मागणी -
परभणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घेवून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी माध्यमांशी बोलताना केली.
या आंदोलनात युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर वाघ, कामगार आघाडीचे महानगर अध्यक्ष रोहित जगदाळे, युवा मोर्चाचे सोनपेठ तालुकाध्यक्ष गणेशराव हांडे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव शिदे, तालुका उपाध्यक्ष विनायक कातकडे आदींसह युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हेही वाचा - Shiv Jayanti 2022 : पाथरीत 10 हजार 392 स्क्वेअर फुटांची रांगोळी प्रतिमा साकारुन शिवरायांना अभिवादन